Maha TAIT

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

Mode of ExamOnline
LevelUG
Level of ExamState Level

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यापूर्वी केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत होती.सदर परीक्षा प्रक्रिया रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वैशिष्टेय विचारात घेवून त्यामधील गुणांच्या आधारे करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.सदर अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्टे खालीलप्रमाणे:-

  1. अभियोग्यता चाचणी शिक्षण सेवक निवड प्रक्रिया सांगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असल्याने मानवी हस्तेक्षेपास वाव राहणार नाही.
  2. या कार्यपद्धतीत संबंधित स्थानिक “स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था” (यापुढे “संस्था” असे वाचावे) यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेवून पदांची जाहिरात, शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणाली किमान कालावधीकरिता प्रसिद्ध करावे लागेल.
  3. अभियोग्यता चाचणीच्या मध्यामाध्यमातून उमेदवारस त्याच्या गुणांमध्ये वाढ करण्याची संधी त्याच्या सेवाप्रवेश वयोमर्यादेत ५ वेळा उपलब्ध होईल.
  4.  अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही. सदर चाचणी परीक्षा दिलेल्या राज्यातील कोणत्याहि उमेदवारास, शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध केलेल्या स्थानिक स्वराज संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जाहीरातीस अनुसरून अर्ज करता येईल.
  5. संस्थेच्या जाहिराठीस प्रतिसाद दिलेल्या उमेदवारांची, अभियोग्यता चाचणीतील गुणांच्या आधारे ज्या विषयासाठी सिक्षांसेवक म्हणून अर्हता प्राप्त उमेदवाराची नियुक्ती करावयाची आहे, त्या विषय-निहाय गुणवता यादीतील अग्रक्रमानुसार शिक्षण सेवक म्हणून निवड सदर संस्थेस करावी लागेल .
  6. शिक्षक भरती गुंवातेच्या आधारे पारदर्शक पद्धतीने व विहित कालमर्यादेत होईल.
  7. शिक्षक भरती प्रक्रीयेमध्ये राज्य शासनाच्या अथवा खाजगी संस्थेचा हस्तक्षेप राहनार नाही.
  8. मा. उच्च न्यायालय व मा. सर्वोच्च न्यायालय यांनी शिक्षक भारती प्रक्रियेबाबत दिलेल्या न्याय निर्णयाची अंमलबजावणी करता येणार आहे.

वरील सर्व बाबीचा विचार करून राज्यातील सर्व स्थानीक स्वराज संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे अभियोग्यता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे भरण्याची बाब शाशानाच्या विचाराधीन होती.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरूप

शिक्षण सेवकाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल,अशा परीक्षा यांत्रानामार्फत आयोजित करण्यात येईल.

सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व राज्यातील सर्व जिल्हयामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील.या चाचणी आयोजन व स्वरूप खालीलप्रमाणे राहील.

१ अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल.अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही.सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.सदर परीक्षा वस्तुनिष्ट बहुपर्यायी स्वरुपाची असेल.

२ समान काठीण्य पातळीचा किमान १० ऑनलाईन प्रश्नपत्रिका सदर परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल.परीक्षार्थ्याना समान काठीण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

३ परीक्षेत मिळालेले गुण उमेदवारास परीक्षा संपल्यास त्वरित कळतील.

४ एका उमेदवारास जास्तीती जास्त ५ वेळा गुण सुधारानेविषयी संधी उपलब्ध राहील.अर्थात,सदर उमेदवारास जास्तीत जास्त ५ वेळा सदर चाचणी देऊ शकेल.

५ परीक्षेत मिळालेले गुण भरती प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या शाळांकरिता(प्राथमिक/उच्च प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक)समान समजण्यात येतील.

६ उमेदवारास सदर परीक्षेत मिळालेले सर्वाधिक गुण,भरती प्रक्रियेंतर्गत प्रवर्गनिहाय कमाल वयोमार्यादेपर्यंत ग्राहय धरण्यात येईल.

७ अभियोग्यता चाचणी परीक्षेची प्रथम आयोजन सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ६ महिन्याच्या आत सदर परीक्षा यंत्रणेकडून करण्यात येईल.तद्नंतर सदर परीक्षा यंत्रणेच्या तयारीनुसार मागणीवर आधारित अशी परीक्षा घेण्यात येईल.तथापि,दोन परीक्षेमधील अंतर ४ महिन्यापेक्षा जास्त असणार नाही.

८ परीक्षेस बसणाऱ्या उमेद्वारांची संख्या अधिक झाल्यास आणि एकाच वेळी सर्वांची ऑनलाईन चाचणी घेण्याची व्यवस्था करता येणे शक्य नसल्यास,काही फेर्यांमध्ये चाचणी परीक्षा घेण्यात येईल.

९ परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा यंत्रणेमार्फत जाहीर करण्यात येईल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

परीक्षेचे मध्यम

परीक्षेचे मध्यम मराठी,इंग्रजी व उर्दू असेल.उमेदवारास यापैकी एक मध्यम निवडावे लागेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

परीक्षेचा अभ्यासक्रम व आराखडा

सदर परीक्षा एकूण २०० गुणाची राहील तसेच परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे दोन घटक राहतील

अनु.क्र.

घटक

शेकडा प्रमाण

एकूण गुण

एकूण प्रश्न

१.

अधियोग्यता

६०%

१२०

१२०

२.

बुद्धीमत्ता

४०%

८०

८०

१००%

२००

२००

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली जाणार नाही

सदर परीक्षा online पद्धतीने घेण्यात येईल.

सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल

परीक्षेची वेळ दोन तास राहील.

  1. अभियोग्यता या घटकांमध्ये गणितीय क्षमता, तर्कीर्क, क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता(English), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व, इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील,
  1. बुद्धिमत्ता या घटकांमध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क व अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध, मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. 

सदर परीक्षा हि विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशीष्टस्तर मर्यादा असणार नाही. तथापि राज्यशासन परीक्षेकारीतेचा अभाय्स्क्रम वेळोवेळी निर्धारित करेल.

एका उमेदवारास जास्तीत जास्त ५ वेळा गुण सुधारणेविषयी संधी उपलब्ध राहील. अर्थात, सदर उमेदवारास जास्तीतजास्त ५ सदर चाचणी देऊ शाकतो.

प्रवर्ग

परीक्षा शुल्क

१.

सर्वसाधारण,OBC,SBC,VJ,NT

Rs.५००/-

२.

अनु.जाती,अनु जमाती व अपंग(Differently able person)

Rs.२५०/-

अभ्यास संदर्भ

१. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक - के' सागर, के सागर पब्लिकेशन्स, पुणे
        वरील दोन्ही पुस्तके परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा  समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
3.बुद्धिमत्ता चाचणीसाठी - के सागर, ज्ञा आ लोळे,पंढरीनाथ राणे, अनिल अंकलगी , सुजित पवार यांची पुस्तके अभ्यासा.
4.अंकगणित - के सागर, प्रमोद हुमने, पंढरीनाथ राणे, लोळे यांची पुस्तके अभ्यासा.
5. शिक्षक अभियोग्यतेसाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे के सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
6.भाषिक क्षमता मराठी- के सागर, लीला गोविलकर, बाळासाहेब शिंदे यांची पुस्तके अभ्यासा.
7.भाषिक क्षमता इंग्रजी - के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे, अवंतकर सर यांची पुस्तके अभ्यासा.
           परीक्षेचा वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

शासनाचा GR शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी  जाहिरात

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

अभियोग्यता चाचणीकरिता उमेदवाराची अहर्ता

इयक्ता १ ली व ८ वी मधील पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती)नियमावली,१९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसाहिक अहर्ता धारण केलेले तसेच,शिक्षण पात्रता परीक्षा (TET)उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्रअसतील तसेच,

इयक्ता ९ वी ते १२ वी मधील शिक्षक पदाकरिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावासाहिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षे करिता पात्र राहतील.

उपरोक्त प्रयोजनासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) म्हणजे राष्ट्रीय शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्रशासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा(TET).

शासनाचा GR शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी

 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी  जाहिरात

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Application Start Date :
Application End Date :
Exam Date :
Result Date :
Conducted By :

Government of Maharashtra

Official Website : https://www.mahapariksha.gov.in