CET CELL Admissions 2024-25

CET CELL Admissions 2024-25

एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर

PUBLISH DATE 21st April 2022

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जेईई मेन आणि नीट परीक्षांच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

सीईटी परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार जून महिन्यात ११ ते २८ तारखेच्या दरम्यान होणार होत्या. मात्र, आता त्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होतील. परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही सामंत यांनी म्हटलं आहे. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी होणारी जॉइंट एन्टरन्स एक्झाम अर्थात जेईई आणि वैद्यरीय प्रवेशासाठी होणारी नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्टरन्स टेस्ट म्हणजेच नीट (NEET) जून व जुलै महिन्यात होणार आहेत.

जेईई मेनचे पहिले सत्र २९ जून तर, दुसरे सत्र ३० जुलै २०२२ रोजी संपणार आहे. तसंच, नीट परीक्षा १७ जुलै २०२२ रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गोंधळ टाळण्यासाठी सीईटी परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. सीईटी परीक्षेसाठी सध्या नोंदणी सुरू आहे. mhtcet2022.mahacet.org किंवा cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना सीईटीसाठी नोंदणी करता येईल.


Related News


एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर
6th August 2021

MHT CET 2021 in September

एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर
8th June 2021

Maharashtra MHT CET 2021

एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर
15th January 2021

EBC Scholarship 2020-21

एमएचटी- सीईटी २०२२ परीक्षा लांबणीवर
12th February 2020

Now, MCA to be 2-yr course