Career Guidance

Career Guidance

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप

PUBLISH DATE 30th March 2021

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतेय स्किल गॅप

हे बेरोजगारीचे एक सर्वात मोठे कारण

४० डोमेन्समध्ये ५०००पेक्षा जास्त जॉब टाइप्स कव्हर करणारे २५० पेक्षा जास्त पर्याय

करिअर मार्गदर्शनातून मिळू शकते नवी माहिती

बारावीनंतर योग्य करिअरची निवड करणे आव्हानापेक्षा कमी नाही. व्यावसायिक मार्गदर्शक करिअर असेसमेंट्स टेस्ट सारख्या अनेक शास्त्रीय तंत्राचा वापर करून योग्य निवड करण्यात मदत करतात. व्यावसायिक सल्लागारही अशी माहिती उपलब्ध करून देतात जी सामान्यांकडे नसते. ते महाविद्यालय आणि अभ्यासक्रमाशी संबंधित अनेक महत्वाची माहिती तर देतातच तसेच महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवरही लक्ष ठेवून असतात तसेच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना माहिती देत असतात. अशा प्रकारे ते विद्यार्थ्यांना योग्यतेनुसार करिअरची निवड करणे आणि विकास आणि यशाच्या मार्गावर जाण्यासाठी तयार करतात.
किती विद्यार्थी या सात क्षेत्राचा विचार करतात
२५० पेक्षा जास्त पर्याय, सात लोकप्रिय
ऑनलाइन करिअर काउन्सिलंग प्लॅटफॉर्म माइंडलरच्या एका सर्वेक्षणानुसार बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांना फक्त सात करिअर पर्यायांची माहिती आहे. सर्व्हेत सहभागी १४ ते २१ वर्षाचे दहा हजार विद्यार्थी देशाच्या वेगवेगळ्या भागातील होते. ते सात पर्याय आहेत- कायदा, अभियांत्रिकी, वैद्यकीय, लेखा व वित्त, डिझाइन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स व आयटी, व्यवस्थापन. महत्वाची बाब म्हणजे संशोधनानुसार देशात जवळपास २५० करिअर पर्याय उपलब्ध आहेत. जे ४० वेगवेगळ्या डोमेन्समध्ये ५०००पेक्षा जास्त जॉब्स टाइप्स कव्हर करतात.

93% विद्यार्थ्यांना नसते सातपेक्षा जास्त करिअर ऑप्शन्सची माहिती

विद्यार्थ्यांना आहे इतर क्षेत्रांची माहिती

इंजिनिअरिंग

23.53%

लेखा व वित्त

11.81%

संगणक अनुप्रयोग आणि आयटी

9.56%

वैद्यकीय

8.08%

व्यवस्थापन

6.71%

डिझायनिंग

6.06%

कायदा

4.38%

भारतीय विद्यार्थ्यांवरील एका सर्व्हेक्षणात आढळून आले आहे, १४ ते २१ वर्षाच्या ९३% विद्यार्थ्यांना २५० पैकी फक्त सात करिअर आॅप्शन्सची माहिती आहे. तज्ञांच्या मते, विद्यार्थ्यांन करिअरविषयी पर्यायांची माहिती नसल्यास अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच मिळणार नाही, हे नक्की. त्यामुळे उपलब्ध रिक्त जागा कधीच भरल्या जाणार नाहीत, अशी समस्या कंपन्यांसमोर उभी राहिल. देशात बेरोजगारीचे प्रमाण खूप जास्त असताना ही स्थिती चिंताजनक आहे. तसेच पर्यायांची माहिती नसल्याने युवकांमध्येही ते कौशल्य नसते ज्याची मागणी नव्या उद्योगात असते, यामुळे एक मोठा स्किल गॅप तयार होतो.


का विद्यार्थ्याच्या आयुष्यात नोकरीची निवड महत्वाचा टप्पा असतो. येथेच करिअरची निवड यश आणि मजबूत भविष्याचा आधार होऊ शकतो तर चुकीची निवड अपयश आणि निराशा घेऊन येतो. गोंधळाच्या स्थितीत तर आणखीनच अडचणी येऊ शकतात. यामुळे व्यवसाय निवडण्याची प्रक्रिया जेवढी लवकर सुरू होईल तेवढे चांगले असते. योग्य वेळी व्यवसाय निवडण्याबाबत मार्गदर्शन मिळाल्यास योग्यता, क्षमता आणि आर्थिक संसाधनांच्या दृष्टीने करिअर निवडू शकता. विद्यार्थी या निर्णयासाठी मुख्यत्वे तीन गोष्टींवर अवलंबून असतात हे दिसते. पहिली आहे, कुटुंबाकडून मिळणारी प्रेरणा, दुसरी आहे सामाजिक संपर्क, तिसरी आहे आर्थिक फायदा. मात्र या ठिकाणी आपली क्षमता आणि योग्यतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. अशा पद्धतीने निवडण्यात आलेले करिअर भविष्यात एक चुकीचा निर्णय ठरू शकतो. व्यावसायिक मार्गदर्शनाने अशी शक्यता दूर तर करता येतेच पण नवीन आणि मागणी असणाऱ्या पर्यायांची माहितीही मिळते.

Article Courtesy: Dainik Bhaskar Network (Divya Marathi)

 

-----------------------------------------------------------------------------------

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur
And VidyarthiMitra.Org
    Organise 

"Exam Warriors" - Practice Exam 2021 based on the new syllabus.

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad, Kolhapur and Vidyarthi Mitra (www.VidyarthiMitra.org) are jointly conducting practice exams for 10th and 12th class students as per the new syllabus of the board.

This exam will be held in your school and college. Registration for participation should be done by following the link below.

Registration and participation is free and students can check their level of study and model answer sheets will also be given to the students through this practice test.

Registration link: https://bit.ly/3t8zpD0

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
6th February 2024

Career In Fashion Designing

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
1st January 2024

AI Trends 2024

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
25th December 2023

Skill Development Courses 2024

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
25th December 2023

UPSC Free Coaching

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
23rd December 2023

Career Tips

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
14th December 2023

Career Tips

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
8th December 2023

Career Options for Arts Stream

करिअरच्या सर्व पर्यायांची माहिती नसल्याने वाढतोय स्किल गॅप
28th November 2023

Career In Railways