Career Guidance

Career Guidance

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स

PUBLISH DATE 27th May 2024

SSC Result 2024 :

आजच दहावीचा निकाल लागला आहे. आता दहावी नंतर ‘करियर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या खास टिप्स आम्ही विद्यार्थ्यांना सांगणार आहोत. निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या शाखेत प्रवेशासाठी लगबग सुरु होते.

नेमका याच वेळी मग विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. काय करावे काही सुचत नाही. पण आम्ही सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या, तर तुमचा संभ्रम होणार नाही. (After SSC Result How Chose Careers, Avoid Mistakes Follow These Tips)

१) आवड आणि इच्छा : तुम्ही जी शाखा निवडता त्यात तुम्हाला पुढील आयुष्यभर काम करायचे असते. त्यामुळे त्यातून किती पैसा कमावता येऊ शकतो. एवढाच विचार न करता आपण हे काम करू शकू का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. तुमचा विषय आणि अभ्यासाबद्दलच्या आवडी-निवडी जाणून घ्या.

त्या माहिती नसल्यास वेळ घेऊन आपल्याला नक्की काय आवडते ते ठरवा. कारण आपल्याला आवडणाऱ्या विषयात काम करण्याचा सहसा माणसाला कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करियर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते. शिवाय आवड असल्याने त्यात प्रगती करणेही अवघड जात नाही.

२) व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास : जर आपण स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला जाणून घेतले तर करियर निवडणे अधिक सोपे होते. कारण त्याने आपण कुठे कमकुवत आहोत, कुठे कमी पडतो हे कळते व त्यावर अधिक लक्ष देता येते. शिवाय आपल्या काय सहज जमते, आपल्यात काय कौशल्ये आहेत. याचीही जाणीव होते. मग अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाला कोणता अभ्यासक्रम आणि कसे करियर अधिक उत्तम ठरेल याचा अंदाज करणे तितकेसे कठीण नसते.

३) अनुभवी लोकांशी चर्चा : ज्या विषयात आपल्याला रस आहे. त्यात पूर्वी करियर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे ठरते. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक, शिक्षक, मोठे बहीण भाऊ यांनाही तुम्ही तुमच्या शंका सांगायला हव्यात. त्याने उत्तरे तर मिळतातच. पण नवीन माहितीही मिळते. या लोकांना बरेचदा तुमच्या बद्दल अशा गोष्टी माहिती असतात ज्याची तुम्हालाही कल्पना नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात.

४) करियर काउंसिलर : जेव्हा बराच विचार करूनही नक्की काय करावे सुचत नाही तेव्हा करियर काउंसिलरकडे जाणे हा उत्तम पर्याय आहे. किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तरीही हा पर्याय असतो. कारण काउंसिलर अशा काही चाचण्या घेतात ज्याने तुमचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे कळते. तुमचे व्यक्तिमत्त्व कशा प्रकारच्या करियरसाठी योग्य आहे हे ही त्यातून कळते. शिवाय त्यांना सगळ्या शाखांबद्दल आणि संधींबद्दल ज्ञान असते. त्यामुळे ते तुमची मोठी मदत करू शकतात.

५) निर्णय क्षमता : तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय मार्ग निवडतेय याचाही विचार करू नका. स्वत:च्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वत: घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. सरते शेवटी तुम्हाला काय करायचे हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा. थोडक्यात काय तर हा निर्णय तुमच्या भविष्यासाठी असल्याने तो पूर्णपणे अभ्यास करून घ्यायला हवा. त्यात पर्यायांचा अभ्यास तर कराच पण स्वतःचा अभ्यास करणेही तितकेच गरजेचे आहे. एकदा का तो केला की कामाला लागा. मग तुमचे ध्येय गाठण्यापासून कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
27th June 2024

JoSAA Counselling 2024

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
7th June 2024

Career Opportunity

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
30th April 2024

While deciding the career

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
6th February 2024

Career In Fashion Designing

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
1st January 2024

AI Trends 2024

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
25th December 2023

Skill Development Courses 2024

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
25th December 2023

UPSC Free Coaching

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
23rd December 2023

Career Tips

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
14th December 2023

Career Tips

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
8th December 2023

Career Options for Arts Stream

दहावीनंतर ‘करिअर’ निवडताना होणाऱ्या चुका टाळा, वाचा या टिप्स
28th November 2023

Career In Railways