डिझाईन रंग-अंतरंग : अभियांत्रिकी पदवीनंतर ‘क्रिएटिव्ह डिझाईन’ क्षेत्रातील आकर्षक करिअर संधी…
डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील समानता आणि परस्पर पूरकता अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाची पायाभरणी करून देते
क्रिएटिव्ह डिझाईन’ क्षेत्रातील आकर्षक करिअर संधी (संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
अभियांत्रिकी पदवीधर हे सर्जनशील बनू शकत नाहीत असे जर कोणास वाटत असेल तर तो एक मोठ्ठा गैरसमज आहे! खरंतर क्रिएटिव्ह डिझाईन क्षेत्रात वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधरांसाठी अनेक नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. इथे त्यांना त्यांची कल्पनाशक्ती, सर्जनशीलता वापरण्याची आणि शिकलेल्या तांत्रिक ज्ञानावर आधारित नावीन्यपूर्ण गोष्टी निर्माण करण्याची सुवर्ण संधी आणि त्याबरोबरच नवीन आव्हाने प्रोत्साहित करत आहेत.
मागील काही वर्षांचा जर आपण आढावा घेतला तर असे लक्षात येते की, अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांना प्रामुख्याने पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर ते तांत्रिक (एम टेक, एम ई, एम एस), व्यवस्थापन (एम बी ए) किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSE) या क्षेत्रांचा विचार करतात. भारतातील काही औद्याोगिक व शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे वगळता अभियांत्रिकीनंतर ‘क्रिएटिव डिझाईन’ क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध असते याची माहिती बऱ्याच तरुणांना माहिती नसल्याचे आढळून आले आहे.
डिझाईन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील समानता आणि परस्पर पूरकता अभियांत्रिकी शिक्षण विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाची पायाभरणी करून देते. विज्ञान, गणित, तंत्रज्ञान यांचे सखोल अभ्यास करण्यास प्रवृत्त करते. यामधील चार वर्षांच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचारसरणी रुजते. त्यांना घटनांचे पृथक्करण करण्याचे आणि निष्कर्ष काढण्याचे कौशल्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक समस्या निराकरणाची ( technology centric problem solving) क्षमता वाढते. विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होतो. सोप्या ते जटिल समस्या सोडवण्याची पद्धतशीर पद्धत शिकवली जाते. हे कौशल्य पुढे अनेक क्षेत्रात उपयोगी पडते.
डिझाईन प्रक्रियेत व संबंधित शिक्षणामध्ये ‘वापरकर्ता केंद्रित दृष्टिकोन’ ( User Centric Approach) हा अत्यंत महत्त्वचा असून, डिझायनरने वापरकर्त्याच्या गरजा, संदर्भ, आवडी निवडी आणि भावना यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी प्रत्यक्ष वापरकर्त्यांच्या सखोल भेटी ( User Interviews and Research) घेऊन त्यांचा संशोधनात्मक अभ्यास करणे, सर्वेक्षण करणे अशा काही कार्य पद्धतींचा उपयोग केला जातो. यामुळे डिझाईनर्स लोकांकडे ‘समभाव’ (Empathetic) दृष्टिकोन विकसित होतो व त्यामुळे याप्रक्रियेतून तयार झालेली उकल किंवा उपाय वापरकर्त्यांना सुयोग्य ठरतात.
डिझाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील समस्या सोडवण्याची कला, दृश्य संप्रेषण व सौंदर्यानुभव संबंधित ( Visual Communication and Aesthetic Sensitivity) कौशल्ये, तांत्रिक कौशल्ये, समानुभूतिपूर्वक (Empathy) समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन, संघकार्य आणि सादरीकरण (Teamwork and Presentation) कौशल्ये तसेच प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये यांचा विकास होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी नवनवीन संकल्पना, संरचना, रूपरेखा आणि उपाययोजना शोधण्यासाठी प्रवृत्त होतात. ते रूढ दृष्टिकोनापलीकडे जाऊन कल्पना निर्माण करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करतात. उदा. ( Brain Storming) उत्स्फूर्त गट चर्चा. यामुळे त्यांचे क्रिएटिव्ह विचार करण्याचे आणि अभिनव समाधान शोधण्याचे कौशल्य वाढते.
सारांश असा की येणाऱ्या काळात जर औद्याोगिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात उत्तम करिअर करायचे असेल तर अभियांत्रिकी ( Engineering) आणि अभिकल्प ( Design) या एकमेकांस अत्यंत महत्त्वाच्या, पूरक व संयोगीत शिक्षणामुळे विद्यार्थ्याना नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
डिझाईनचे पदव्युत्तर शिक्षण व संस्था? यातील शाखा? प्रवेश परीक्षा? करिअर संधी?
भारतात अनेक संस्था क्रिएटिव्ह डिझाईन क्षेत्रात प्रशिक्षण देतात. यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ( https:// www. nid. edu), आयडिसी स्कूल ऑफ डिझाईन – भारतीय प्रौद्याोगिकी संस्थान मुंबई, हैदराबाद, गावहत्ती, जोधपूर (https:// www. idc. iitb. ac. in), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर (https:// cpdm. iisc. ac. in/ cpdm/ mdes. php) या अग्रगण्य संस्था आहेत. त्याचप्रमाणे अनेक खासगी डिझाईन संस्था पुणे, मुंबई, बंगलोर, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, डेहराडून येथे आहेत. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम अभियांत्रिकी पदवी नंतर दोन ते अडीच वर्षांचा असून या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्रिपदरी प्रक्रिया पार पाडावी लागते. प्रथम लेखी प्रवेश परीक्षा, नंतर स्टुडिओ (डिझाईन संस्थेमध्ये जाऊन प्रत्यक्ष कृती-आधारीत) चाचणी व शेवटी मुलाखत. याविषयी सर्व सखोल माहिती अनेक समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे.
डिझाईन संस्थामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी ‘डिझाईन म्हणजे नेमके काय आणि त्या क्षेत्रात करिअर का करायचे आहे याची स्पष्टता असणे हे सर्वात महत्त्वाचे’ झ्र चित्रकला, रंगाकला, वास्तुशास्त्र, कल्पकता आणि डिझाईन मधील साम्य व फरक माहीत असणे हे अपेक्षित आहे. या संस्थांमधील प्रवेशासाठी विशिष्ट तयारी करणे आवश्यक आहे. उदा. संकल्पना रेखाटन किंवा कन्सेप्ट स्केचिंग, कलात्मक कौशल्ये, सर्जनशील विचार, निरीक्षण क्षमता, सामाजिक जाणीव आणि त्याविषयी जागरूकता, नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. तसेच संस्थांच्या प्रवेशिका परीक्षांच्या स्वरूपानुसार विशिष्ट तयारी करणे योग्य ठरू शकते. डिझाईनमध्ये ३० पेक्षा अधिक उपशाखा आहेत, त्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी कोणती विशिष्ट उपशाखा निवडावी हे ठरवणे आवश्यक आहे. उदा. प्रॉडक्ट डिझाईन, ग्राफिक डिझाईन, यूजर एक्सपिरियंस ( User Experience) डिझाईन, सर्वसमावेशक ( Universal Design), अॅनिमेशन, टॉय अँड गेम डिझाईन इत्यादी. त्यानंतर निवडलेल्या क्षेत्रात प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नेमकी कोणती शाखा निवडावी यासाठी तज्ज्ञ व अनुभवी डिझाईनर्सची मदत किंवा सल्ला घेणे योग्य ठरते. डिझायनरच्या करिअरमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित नवे प्रकल्प हाताळण्याची संधी मिळत असल्याने व्यापक अनुभव संपादन करता येतो. उदा. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, टेलीकॉम, ऑटोमोबाइल, शिक्षण, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमता आधारित स्टार्टअप्स, सामाजिक संस्था इत्यादी. अशा रीतीने डिझाईन क्षेत्र उत्तम कारकीर्द घडविण्याच्या संधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे विद्यार्थी या दिशेने उत्तम वाटचाल करू शकतात. योग्य मार्गदर्शन, नवनवीन प्रयोग करायची आवड, सर्जनशीलता आणि परिश्रमामुळे या क्षेत्रात त्यांना खूपच यश व नावलौकिक मिळविता येईल.
Register for Free Mock Test:
------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
Career Opportunities in Psychology
विद्युत अभियंता होताना...
इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय
‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
NEET MDS Counselling 2024
JoSAA Counselling 2024
करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी
Best Career Options In 2024
JoSAA Counselling 2024:
व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी
Career Options : बारावीनंतर विद्यार्थ्यांचे मिशन ॲडमिशन
Career Opportunity
बोला, अधिक आत्मविश्वासाने!
शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘लॉ’मधील करिअर
बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी
Fashion Designing Course in Abroad
‘नर्सिंग’मधील करिअर
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
Top 5 Career In Pharmacology
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे करिअर क्षेत्र