Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी

PUBLISH DATE 25th October 2023

फूटवेअर इंडस्ट्रीचा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विदेशातील अनेक नावाजलेले फूटवेअर ब्रॅंड्स भारतात त्यांचे कारखाने सुरू करणार आहेत. या कंपन्यांमध्ये Nike, Adidas चा समावेश आहे. या कंपन्या भारतात मोठी गुंतवणूक करणार आहेत.

या माध्यमातून भारतीय तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शूज, चप्पल्स, सॅंडेल्स इत्यादी अनेक प्रकार फूटवेअरमध्ये आहेत. मागील काही वर्षांमध्ये फूटवेअर इंडस्ट्रीचा विस्तार चांगलाच वाढत चालला आहे. त्यामुळे, फूटवेअर डिझायनिंग या क्षेत्रात आता करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.

जर तुम्हाला फूटवेअर डिझायनिंगची आवड असेल आणि या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे असेल, तर या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकता. हे शिक्षण घेऊन तुम्ही तुमचा पाया आणखी पक्का करू शकता. विशेष म्हणजे या क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येतात.

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूटने आजपासून (२५ ऑक्टोबर बुधवार) पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन लिंक सुरू केली आहे.

ज्या उमेदवारांना यासाठी अर्ज करायचा आहे, ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया 2024-25 साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी असणार आहे.

अर्ज कसा करायचा ?

या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यासाठी, तुम्हाला फूटवेअर डिझाईन आणि विकास संस्थेच्या (फूटवेअर डिझाईन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट इंन्स्टिट्यूट) अधिकृत वेबसाईटवर (fddiindia.com.) जावे लागेल. या वेबसाईटवर तुम्हाला या अभ्यासक्रमाबाबतची अधिकची माहिती मिळेल आणि तुम्हाला अर्ज ही करता येईल.

कोण करू शकतं अर्ज ?

फूटवेअर डिझायनिंगच्या या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही २५ वर्षे आहे. तसेच, या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादेसाठी १ जुलै २०२४ पासून वयाची गणना करण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश करण्यासाठी उमेदवाराने पदवीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

शिवाय, या अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 600 रूपयांचे शुल्क भरावे लागेल. तसेच, SC, ST, PWD प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

या अभ्यासक्रमासाठी निवड कशी होणार ?

फूटवेअर डिझायनिंगच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला FDDI AIST 2024 ही प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. या प्रवेश परीक्षेसाठीच ही नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेश परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

या प्रवेश परीक्षेचा कालावधी हा २ तास ३० मिनिटे असणार आहे. या परीक्षेत एकूण १५० प्रश्न असतील. हे प्रश्न एकूण 200 गुणांचे असतील. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही. ही निवड चाचणी फूटवेअर डिझाईन आणि विकास संस्थेद्वारे घेतली जाते.

Related News

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
28th November 2023

Career In Railways