Career Guidance

Career Guidance

Career In Railways

PUBLISH DATE 28th November 2023

Career In Railways : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक तरूण उत्सुक असतात. भारतीय रेल्वेमध्ये विविध प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. दवर्षी या विभागांमध्ये विविध पदांवर भरती केली जाते, त्यासाठी अनेक तरूण अप्लाय करत असतात.

तुम्हाला फक्त या  विविध विभागांच्या वेबसाईट्सवर नजर ठेवावी लागते आणि सतत अपडेट्स चेक करावे लागतात. रेल्वे विभागामध्ये टीटीई या पदावर ही दरवर्षी भरती केली जाते.

मात्र, अनेकांना टीटीई हे पद नेमके आहे काय? आणि टीटीई झाल्यानंतर नेमके काय काम करावे लागते? याची माहिती नसते. त्यामुळे, आज आपण टीटीई करिअर संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत.

टीटीई म्हणजे नेमके काय?

रेल्वे विभागातील एक प्रमुख पद म्हणून टीटीई पदाला ओळखले जाते. अनेक जण टीसी आणि टीटीई या दोन्ही पदांमध्ये गोंधळून जातात. अनेकांना असे वाटते की, टीटीई आणि टीसी हे सारखेच आहेत. मात्र, असे अजिबात नाही.

टीटीई म्हणजे ट्रॅव्हलिंग तिकीट एग्जामिनर (प्रवास तिकीट परीक्षक). टीटीईचे प्रमुख काम हे आहे की, रेल्वेमध्ये प्रवाशांची तिकीटे चेक करणे. टीसी हा देखील तिकीट चेक करण्याचे काम करतो. मात्र, टीसी रेल्वे स्टेशनवर तिकीट चेक करतो आणि टीटीई हा रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे तिकीट चेक करण्याचे काम करतो.

भारतीय रेल्वेमध्ये या टीटीई पदाच्या नोकरीसाठी असंख्य तरूण अर्ज करत असतात आणि परीक्षेची तयारी देखील करतात.

उमेदवाराची पात्रता

रेल्वेमध्ये टीटीईच्या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाते. प्रमुख बाब म्हणजे उमेदवाराने ५०% गुणांसहीत १२ वी उत्तीर्ण असणे महत्वाचे आहे.

टीटीईसाठी अशी करा तयारी

टीटीईच्या पदावर नोकरी करण्यासाठी तुम्हाला एक लेखी परीक्षा द्यावी लागते. या लेखी परीक्षेत १५० प्रश्नांची उत्तरे उमेदवाराला द्यावी लागतात. ज्यामध्ये, जनरल नॉलेज, तर्क-वितर्क, गणित इत्यादी विषयांशी निगडीत प्रश्नांचा समावेश असतो.

या परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही या परीक्षेशी निगडीत असलेल्या पुस्तकांची मदत घेऊ शकता आणि त्यासोबतच तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे, तुमची चांगली तयारी होण्यास मदत होईल.

उमेदवाराने टीटीईची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी द्यावी लागते. या चाचणीमध्ये पास झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांची निवड केली जाते.

----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2023: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2023 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2023 | JoSSA 2023 | MHT-CET 2023 | MBA 2023 | Pharmacy 2023 | Polytechnic 202

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


Career In Railways
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

Career In Railways
6th February 2024

Career In Fashion Designing

Career In Railways
1st January 2024

AI Trends 2024

Career In Railways
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

Career In Railways
25th December 2023

Skill Development Courses 2024

Career In Railways
25th December 2023

UPSC Free Coaching

Career In Railways
23rd December 2023

Career Tips

Career In Railways
14th December 2023

Career Tips

Career In Railways
8th December 2023

Career Options for Arts Stream