Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना

PUBLISH DATE 18th October 2023

दहावीत आल्यानंतर पालकांना लगेच वेध लागतात ते आपल्या पाल्याच्या करिअर विषयी. आपल्या पाल्यांनी काय व्हावे आणि काय होऊ नये याच्या विषयी चर्चांचे तास रंगू लागतात. ज्या क्षेत्रात आपले सगळे आयुष्य घालवायचे आहे त्याचा निर्णय असा केवळ आई वडिलांनीच घेऊन कसे चालेल?

आता शालांत परीक्षेची तयारी करू का करिअर कोणते निवडायचे याचा अभ्यास करू असे मुलांना वाटायला लागले तर नवल नाही. काय करणार जीवन हे असेच आहे. एकदा का चक्रात सापडलो की मग बघू, नंतर विचार करू असे करून चालतच नाही. निर्णय हा घ्यावाच लागतो, आज ना उद्या.

करिअर निवडीचा एक सोपा निकष आणि तो म्हणजे एक साधा प्रश्न विचारा तुमच्या मनाला... ‘इथून पुढे दहा ते पंधरा वर्षांनंतर तुम्ही स्वतःला कुठे पाहू इच्छिता?’ अर्थात या प्रश्नांचे उत्तर मिळवणे वाटते तितके सोपे नाही? आई वडिलांनी निवडलेला मार्ग आपल्याला डोळ्यांसमोर दिसत असतो, तो आपण रोजचा अनुभवत असतो. तो निवडण्यात काही गैर नाही. काहींच्या पुढे त्याला पर्यायही नसतो.

अर्थात हे वेळीच जाणून घेणं लाभदायकच. आपण काहीतरी वेगळेच केले पाहिजे असा आग्रह का असावा? परंतु त्या व्यवसायाची पार्श्वभूमी आपल्या अनुभवात असली तरी तेवढेच पुरेसे आहे का? संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा हा क्षण जाणीवपूर्वकच अनुभवला पाहिजे.

करिअरची वाट कशी निवडाल?

अजून तर खूप शिकायचे बाकी आहे? आत्ताच काय त्याचं? असे बालसुलभ प्रश्न तुमच्या मनात डोकावत असतील ही कदाचित. परंतु नाही, योग्य वेळीच तुम्ही याचा विचार करावा. ज्या प्रकारचे करिअर तुम्ही निवडाल त्याला अनुसरूनच कोणती विद्या शाखा निवडायची ते ठरवावे लागेल. निवड ही एकदाच करावी लागते आणि मग त्यानंतर ती निवड सार्थ ठरवावी लागते. अर्थात नाहीच जमल, पटल तर निर्णय बदलता येतो. सारच काही संपल अस कधीच नसतं. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करता येते.

कुणाला काय वाटते यापेक्षा आपली आवड महत्त्वाची. तुम्हाला स्वतःला कशात रस आहे याचा शोध घेणं महत्त्वाचं. आपल्याला काय करायला, पहायला आवडत, कशात आपलं मन रमतं तेच तर आपल्या आवडीचे क्षेत्र. आवड निर्माण करायची असते, त्याचा शोध घ्यायचा असतो, ती वाढवायची असते. नुसतीच आवड असून चालत नाही तर त्यासाठी आवश्यक मेहनत, कष्टाची तयारी ठेवावी लागते.

आवड आणि छंदाशी संबंधित व्यवसाय वाट शोधावी तरच आयुष्यात आनंदात नोकरी, धंदा करता येईल हे नक्की. आपल्या पालकांना विचारा ते त्यांनी निवडलेल्या कार्यात आनंदी, समाधानी आहेत का? अर्थात या प्रश्नाचे उत्तर महत्त्वाचे. छंदाशी जोडलेले क्षेत्र निवडा आपण हाती घेतलेले काम हे कामच वाटणार नाही. प्रत्येक दिवस हा आनंदाचाच असेल.

स्वतःमधील बलस्थान आणि त्रुटी यांचा अभ्यास करायला हवा. मला काय जमते, काय करण्यासाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागते? यातच त्याच उत्तर. हा स्वतःचा शोध घ्या. त्यासाठी आपले पालक आणि मित्रमंडळी यांच्याशी बोला, अगदी मोकळेपणाने.

पांघरूण पाहून हात पाय पसरावे! अर्थात ठरावीक व्यवसाय कितीही आकर्षक वाटत असला तरी त्याच्या तयारीसाठी लागणारा खर्च आपल्याला परवडणारा आहे का? त्याचे आर्थिक अंदाजपत्रक आपल्या मर्यादेत आहे का याचा शोध घ्या. आर्थिक गणित महत्त्वाचे. भविष्यवेधी बना. आपल्या भोवताली आपल्याला एवढे पर्याय दिसत आहेत, त्यात आपण स्वतःला कुठे पाहू इच्छिता याचा विचार करा.

पण हे करताना केवळ स्वप्नाळू राहू नका. प्रत्यक्षात जमिनीवर राहून विचार महत्त्वाचा. निर्णय कोणताही घ्या. परंतु तो केवळ पैसा डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला नसावा. एवढे मात्र नक्की. त्यातून निराशाच पहायला लागायची. असा हा करिअर निवडीचा मार्ग म्हटलं तर सोपा नाहीतर खडतर.

- डॉ. उमेश दे. प्रधान

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
28th November 2023

Career In Railways