Career Guidance

Career Guidance

विद्युत अभियंता होताना...

PUBLISH DATE 14th August 2024

शहरामध्ये बहुधा असे एकही घर सापडणार नाही की, ज्यात इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडणार नाहीत. अणुविद्युत कण (इलेक्ट्रॉन) आणि विद्युत ऊर्जेचा शोध जगात मोठी क्रांती घडवून गेला. विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या बल्ब, मोटर, इस्त्री, ओव्हन, मिक्सर, फ्रीज या व अशा अनेक इलेक्ट्रिक उपकरणांमुळे जीवन सुकर झाले, तर टीव्ही, संगणक, मोबाईल, यंत्रमानव या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जीवन समृद्ध झाले.

विद्युत ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक उपकरणे यांपेक्षा इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी मोठा बदल घडवून आणला. इलेक्ट्रिकल उपकरणांपेक्षा इलेक्ट्रॉनिक उपकरणे अधिक ‘स्मार्ट’ आहेत आणि ती अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत चालली आहेत. म्हणूनच या क्षेत्रात चांगल्या अभियंत्यांची अतिशय गरज आहे.

कारखान्यांमध्ये उपकरणांची नव्याने निर्मिती करणे किंवा संशोधन करणे, उपकरणांचे उत्पादन करणे, गुणवत्ता राखणे, विक्री करणे अशा विविध प्रकारच्या भूमिका कराव्या लागतात. उपकरणांचा दुरुस्ती व्यवसायही मोठी तेजी असलेला व्यवसाय आहे.

प्रवेश व अभ्यासक्रम

या प्रकारच्या अभियांत्रिकीचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे दोन प्रकार आहेत. बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेता येतो. दहावीनंतरही पदविकेसाठी प्रवेश घेता येतो. अभियांत्रिकीच्या गाभ्याच्या प्रकारात मोडत असल्याने सर्वसाधारणपणे सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयात हे अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक अथवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांची रचना, विकास आणि चाचणीसाठी व्यावहारिक प्रशिक्षण मिळते. विद्यार्थ्यांना संप्रेषण (कम्युनिकेशन), नियंत्रण प्रणाली (कंट्रोल सिस्टिम), सिग्नल प्रोसेसिंग, रेडिओ फ्रिक्वेन्सी डिझाइन, मायक्रोप्रोसेसर, वीजनिर्मिती इत्यादींसारख्या उपअभियांत्रिकी शाखांमध्ये विशेष अभ्यास करावा लागतो. इलेक्ट्रॉनिक अथवा इलेक्ट्रिक सर्किट्‌स नव्याने रचताना आणि त्यातील चुका शोधताना समस्या निराकरण करण्याची क्षमता आणि संश्लेषण- विश्लेषण क्षमता लागतात. गणित व भौतिकशास्त्रातील विशेष अभ्यास लागतो.

विविध प्रकार

अलीकडच्या काळात मेकॅनिकल वस्तू फक्त मेकॅनिकल राहिल्या नसून त्यात इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचे भाग बऱ्याच वेळेला असतात. इलेक्ट्रिक वस्तू फक्त इलेक्ट्रिकल राहिल्या नसून त्यात इलेक्ट्रॉनिक सर्किट मोठ्या प्रमाणात असतात, तसेच इलेक्ट्रॉनिक सर्किट फक्त इलेक्ट्रॉनिक राहिल्या नसून त्यात संगणकीय प्रणालीसुद्धा असतात. त्यामुळे पायथॉन, जावा, सी, सी ++ यांसारख्या किंवा किमान स्क्रॅचसारख्या संगणकीय भाषासुद्धा याव्या लागतात.

अलीकडच्या काळात सर्किट डिझाइन संगणकावरच होत असल्याने संगणकाच्या साहाय्याने डिझाइन करण्याची प्रणाली (कॉम्प्युटर एडेड डिझाईनिंग-कॅड) येत असले पाहिजे. म्हणजेच जरी एका प्रकारच्या अभियांत्रिकी प्रकाराचा जरी विशेष अभ्यास केलेला असला, तरी उर्वरित अभियांत्रिकी प्रकारांचा किमान अभ्यास केलेला असावा लागतोच. सगळ्याच शाखा या बहुप्रकारच्या आणि एकात्मिक होत चालल्या आहेत. यंत्रमानवशास्त्र(रोबोटिक्स)मध्ये तर सर्वच गोष्टी याव्या लागतात. यात यांत्रिक, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकीय अशा सर्व प्रकारच्या प्रणाली एकत्र काम करतात.

विविध कौशल्ये

या क्षेत्रात एकाच जागी बसून खूप काळ काम करण्याची तयारी लागते. इतर कोणत्याही प्रकारच्या कामात लागते तसेच गटात काम करण्याची क्षमता, संवाद कौशल्य, वेळेचं नियोजन ही कौशल्ये ही असावी लागतात. अधिकाधिक वरच्या पदांवर जाल, तसे प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि नेतृत्वकौशल्यही पणाला लागते.

इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही अनेक प्रकारे काम करू शकता. यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ अभियंता, गुणवत्ता नियंत्रण अभियंता, नियंत्रण आणि उपकरण अभियंता, डिझाईन अभियंता, विद्युत अभियंता, प्रसारण अभियंता, उत्पादन प्रणाली अभियंता, प्रणाली विश्लेषक, इलेक्ट्रॉनिक्स अभियंता, आयटी सल्लागार, सिस्टिम डेव्हलपर, नेटवर्क अभियंता असे प्रकार येतात.

वाढती स्पर्धा

जर आपण पगाराबद्दल बोललो तर, एक इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियंता सुरुवातीच्या टप्प्यात वर्षाला सरासरी ४ ते ६ लाख रुपये मिळवू शकतो. क्षेत्रातील व्यक्तीच्या अनुभवाच्या पातळीनुसार या नोकरीसाठी पगाराची शक्यता झपाट्याने वाढते. मात्र त्याचबरोबर स्पर्धाही वाढत चालली आहे.

केवळ संधी आहे म्हणून या क्षेत्रात येण्याऐवजी या क्षेत्रात लागणाऱ्या क्षमता व अभिवृत्ती असणारे विद्यार्थीच शेवटपर्यंत टिकू शकतात. यंत्रमानव, इंटरनेट ऑफ थिंग्ज व तत्सम यंत्रांच्या व यंत्रणांच्या निर्मितीमुळे एकाच क्षेत्रातील तज्ज्ञतेऐवजी बहुशाखीय ज्ञान आणि एकात्मिक विचार करण्याची क्षमता असण्याची गरज निर्माण झाली आहे.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


विद्युत अभियंता होताना...
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्युत अभियंता होताना...
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्युत अभियंता होताना...
7th June 2024

Career Opportunity

विद्युत अभियंता होताना...
30th April 2024

While deciding the career

विद्युत अभियंता होताना...
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्युत अभियंता होताना...
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्युत अभियंता होताना...
1st January 2024

AI Trends 2024

विद्युत अभियंता होताना...
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्युत अभियंता होताना...
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्युत अभियंता होताना...
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्युत अभियंता होताना...
23rd December 2023

Career Tips

विद्युत अभियंता होताना...
14th December 2023

Career Tips

विद्युत अभियंता होताना...
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्युत अभियंता होताना...
28th November 2023

Career In Railways