Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा

PUBLISH DATE 1st November 2023

‘राही तू तर चांगली पास झाली आहेस की मग असा उदास चेहरा करून का बसली आहेस?’

‘‘काही नाही हो काका, मला फक्त इंग्रजीमध्येच चांगले मार्क्स आहेत. गणित आणि विज्ञानात काही चांगले नाहीत? आता मी काय करणार?’’

‘‘अग इंग्रजी चांगले येतंय ना. मग तर तुला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.’’

‘‘ते कसे काय? मला काय करिअर करता येईल इंग्रजीतून?’’

“भाषेवर प्रभुत्व मिळवलेली व्यक्ती कितीही उंचीवर जाते हे तू आजूबाजूला कधी पाहिलं आहेस का? जीवनाच्या विविध क्षेत्रात इंग्रजीची गरज आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर तुझ्यासाठी येथे अनेक संधी आहेत. आता हेच बघ...

शिक्षण क्षेत्र : इंग्रजीतून पदवीपर्यंत शिकल्यानंतर तू अनेक स्तरांवर उत्तम शिक्षक होऊ शकते. विद्यापीठ विभागाचे प्राध्यापक किंवा वाचक होशील. नाहीतर स्वतःचे खासगी शिकवणी वर्गात ट्यूटर म्हणूनही काम करू शकते किंवा इन्स्ट्रक्टर होऊ शकते. अर्थातच पीजीडीटीई, बीएड, एमएड, नेट, सेट, एमफिल आणि डॉक्टरेट यांसारख्या व्यावसायिक पदवी तुला उच्च स्तरावर जाण्यास मदत करतील.

पत्रकारिता : मीडियासारख्या क्षेत्रात वाढती मागणी आहे. तू रिपोर्टर होऊ शकतेस. कालांतराने संपादक बनू शकतेस. तुझे स्वतःचे लेखन, लेख प्रकाशित करू शकतेस. तुझं भाषेवर आणि शैलीवर प्रभुत्व असल्याने तू स्तंभलेखक होऊ शकतेस. तुझी मते आणि विचारांसह तू चांगली समीक्षक होऊ शकते. तुझे विचार पुढच्या पिढीची मते आणि विचार तयार करू शकतात.

परफॉर्मिंग आर्ट : टीव्हीच्या अनेक चॅनेल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रगतीमुळे अँकर, प्रस्तुतकर्ता, उद्‍घोषक, सूत्रधार यासारख्या मार्गांना सर्वाधिक मागणी आहे. इंग्रजीच्या वापरातील ओघ आणि इंग्रजी बोलण्यात तुझे प्रावीण्य आणखी पुढे जाण्यास मदतच करेल. तू रेडिओ जॉकी होऊ शकतेस. नाटक आणि चित्रपट उद्योग स्क्रीप्ट आणि संवाद लेखनासाठी व्यावसायिक लेखक म्हणून तुझे तर स्वागतच होईल. कथा, पटकथा यांनापण भरपूर मागणी आहे.

कार्यालये : कोणत्याही कंपनीच्या अगदी मूलभूत कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट हाऊसेस, बँकांपर्यंत किंवा हॉटेल्समध्ये व्यावसायिक अभ्यागतांशी व्यवहार करण्यासाठी फ्रंट ऑफिस असते. ग्राहकांशी व्यवहार करताना भाषेचा सुरेख वापर आवश्यक असतो. इंग्रजीतील ओघवतेपणा तुला रिसेप्शनिस्ट, फ्रंट-ऑफिस मॅनेजर, जनसंपर्क अधिकारी इत्यादी पदे देऊ शकतो. बोली भाषेवरील प्रभुत्व, सॉफ्ट स्किल्सचा वापर आणि देहबोलीचा योग्य वापर यामुळे तुला कोणत्याही संस्थेचा महत्त्वाचा हिस्सा बनता येईल.

कायद्याचे क्षेत्र : अधिवक्ता, वकील, न्यायाधीश ही पदानुक्रमे आहेत. कायद्याच्या शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण तुम्हाला अधिक आरामदायक पोझिशन्स मिळवून देईल. कायदेशीर कागदपत्रे हाताळण्यासाठी भाषेचा औपचारिक वापर आहे. वक्तृत्वातील कौशल्येही खोलवर परिणाम करतात आणि तू या अनोख्या व्यवसायात यशस्वी होशील.

फ्री लान्स लेखन : सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर फ्री लान्स वापरकर्ती होऊ शकते.

द्वि-भाषिक : तू एकापेक्षा जास्त भाषांमध्ये चांगली असशील, तर तू अनुवादक किंवा दुभाषी होऊ शकते. ज्या कंपन्या विविध देशांकडून तंत्रज्ञान उधार घेतात त्यांना साहित्य समजून घेण्यासाठी अनुवादकांची आवश्यकता असते. विविध देशांना भेट देणारे अधिकारी, नेते

यांच्यासोबत दुभाषी असणे आवश्यक आहे. तू व्यावसायिक भाषांतरकाराची नोकरी स्वीकारू शकते ज्यामुळे भरपूर पैसे मिळू शकशील!

पर्यटन : प्रवास आणि पर्यटन उद्योग क्षेत्रात भाषांवर प्रभुत्व असलेल्या व्यक्तींची गरज असते. तू पर्यटन आणि गाइड या विषयात छोटा डिप्लोमा केल्यास वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याचा आणि समाजाच्या विविध स्तरांशी संपर्क साधण्याचा आनंद घेऊ शकते.

‘‘बापरे, काका तुम्ही माझ्यासमोर अगदी अलिबाबाची गुहाच उघडी केली की. ही सगळी तर माझ्या आवडीचीच क्षेत्र आहेत.’’

‘‘मग निवड यातलं कोणते तरी एक आणि लाग त्याच्या मागे.’’

लेखिका- डॉ. उमेश दे. प्रधान

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
28th November 2023

Career In Railways