Career Guidance

Career Guidance

दातांचे डॉक्टर व्हायचंय?

PUBLISH DATE 7th February 2024

दातांचे डॉक्टर होण्यासाठी बीडीएसची पदवी घेणे आवश्‍यक असते. बीडीएस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. दाताच्या डॉक्टर्सना डेंटिस्ट किंवा दंतवैद्य म्हणतात. दातांची काळजी न घेणे, अस्वच्छता, चुकीचा आहार, अपुरे पोषण, पीढीजात आरोग्य दोष किंवा अन्य काही समस्यांमुळे दातांच्या व्याधी निर्माण होतात. आपल्या देशाची लोकसंख्या आणि सध्याची जीवनशैली पाहता दातांच्या डॉक्टरांना मोठा स्कोप आहे.

पात्रता आणि प्रवेशपरीक्षा

बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी (पीसीबी) हे विषय आवश्यक आहे. राष्ट्रीय स्तरावरील नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स) परीक्षा द्यावी लागते. भारतात सुमारे ३२९, तर महाराष्ट्रात २८ दंतमहाविद्यालये आहेत. भारतात सुमारे २८ हजार जागा उपलब्ध आहेत.

प्रवेश प्रक्रिया

नीट परीक्षेमध्ये ‘कट ऑफ’पेक्षा जास्त मार्क्स मिळाले की, मग काऊन्सलिंगसाठी (समुपदेशन) जाता येते. काऊन्सलिंगच्या माध्यमातून केंद्रीय प्रवेश पद्धतीतून प्रक्रिया पार पडते. साधारणपणे काऊन्सलिंगचे तीन किंवा अधिक राउंड्स प्रवेश प्रक्रियेत असतात. प्रवेशप्रक्रियेतील नियम त्या त्या वर्षी जाहीर केले जातात.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

बीडीएस हा पाच वर्षांचा पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम आहे. यामध्ये चार वर्षांचे महाविद्यालयीन शिक्षण असते, तर एक वर्षाची इंटर्नशिप असते. दंतवैद्यक महाविद्यालय हे डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांच्या अधीन असते. डेंटल हिस्टोलॉजी, ओरल पॅथॉलॉजी, ओरल सर्जरी, पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री, ऑर्थोडोंटिक्स, डेंटल हेल्थ, डेंटल सर्जरी, डेंटल मटेरिअल्स, ओरल मेडिसिन, प्रीव्हेंटिव्ह डेन्टिस्ट्री आदी विषय या अभ्यासक्रमात अभ्यासले जातात.

संबंधित विषयांची थिअरी आणि भरपूर प्रात्यक्षिके असतात. अभ्यासक्रम हा फाऊंडेशन, मुख्य विषय, ऐच्छिक विषय आणि प्रोजेक्ट्समध्ये विभागाला आहे. त्याशिवाय ग्रुप प्रोजेक्ट्स, केस मेथोडॉलॉजी, वर्कशॉप आणि प्रात्यक्षिकेही करवून घेतली जातात. महाविद्याले इस्पितळांना जोडलेले असल्याने प्रात्यक्षिके करताना कामाचा थेट अनुभव मिळत असतो.

नोकरीची ठिकाणे आणि पदे

हॉस्पिटल्स, डेंटल क्लिनिक, डेंटल महाविद्यालये, डेंटल प्रॉडक्ट उत्पादक आदी ठिकाणी डेंटिस्टना त्यांची सेवा देता येते. डेंटिस्ट, डेंटल रीसर्च सायंटिस्ट, लेक्चरर, डेंटल ऑफिसर, डेंटल सर्जन अशा पदांवर काम करता येते.

उच्च शिक्षण

मास्टर ऑफ डेंटल सर्जरी, एमडीएस (पेडियाट्रिक डेन्टिस्ट्री /रेडिओलॉजी अँड ओरल मेडिसिन/प्रीव्हेंटिव्ह डेन्टिस्ट्री/ एंडोडोंटिक्स ), मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, एम.बी.ए. इन हेल्थकेअर मॅनेजमेंट अशा विषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येते.

काम

बीडीएस पदवीधरांना डेंटिस्ट कामाचे लायसेन्स मिळते. स्वतःचे क्लिनिक, हॉस्पिटल्स, कम्युनिटी हेल्थ सेंटर्स, रिसर्च सेंटर्स आणि महाविद्यालयांमध्ये कार्य करता येते. तोंडाचे आरोग्य, दाताच्या समस्या, दातांचे विकार-आजार, हिरड्यांचे आरोग्य हे त्यांच्या कामाचे क्षेत्र आहे. अपघातासंबंधी सर्जरी सोडली, तर डेंटिस्टला इमर्जन्सी काम येत नसते. येणारे पेशंट अपॉइंटमेंट घेऊन दिलेल्या वेळी येत असतात. हे काम घाईचे नसते, पण अचूकतेचे असते.

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


दातांचे डॉक्टर व्हायचंय?
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
6th February 2024

Career In Fashion Designing

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
1st January 2024

AI Trends 2024

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
25th December 2023

Skill Development Courses 2024

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
25th December 2023

UPSC Free Coaching

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
23rd December 2023

Career Tips

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
14th December 2023

Career Tips

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
8th December 2023

Career Options for Arts Stream

दातांचे डॉक्टर व्हायचंय?
28th November 2023

Career In Railways