अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश

MHT-CET, JEE, NEET Online Free Mock Exam 2022


अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना स्वतःची अभ्यासाची तयारी व पातळी तपासण्याची संधी सराव परीक्षेच्या द्वारे उपलब्ध करून देत आहोत. सराव परीक्षेत (Mock Exam) भरपूर सराव केल्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो.
केवळ भरपूर अभ्यास केला म्हणजे यश मिळत नाही तर यश मिळवण्यासाठी अभ्यासाला योग्य दिशा मिळाली पाहिजे आणि अभ्यासाची पातळी तपासण्यासाठी योग्य वातावरणात परिक्षा देऊन पाहिली पाहिजे आणि त्यातून अजुन किती तयारी बाकी आहे ह्याचा बोध घेतला पाहिजे. यामध्ये विद्यार्थ्याला भरपूर सराव झाल्या मुळे ऐन परिक्षेच्या काळात येणारा मानसिक तणावही येणार नाही

नोंदणी व सहभाग मोफत असून महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना भविष्यातील प्रवेश परीक्षांचा अधिकाधिक सराव व्हावा व त्यांच्या अभ्यासाची पातळी तपासता यावी तसेच सराव योग्य रीतीने व्हावा याकरिता
"अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि विद्यार्थी मित्र (www.vidyarthimitra.org)"

संयुक्तपणे मागील ५ वर्षांपासून ऑनलाइन सराव परीक्षा विद्यार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत.

वैशिष्टे

  1. मेडिकल, इंजिनीरिंग व फार्मसीचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण राज्यामध्ये मोफत ऑनलाईन सराव परीक्षा
  2. तज्ञ व अनुभवी पेपर सेटर्स, डॉक्टर्स व शिक्षकांची टीम
  3. प्रत्येक Chapter वरील MCQs चा भरपूर सराव
  4. गुणांकन योजना व पेपर पॅटर्न मुख्य परीक्षेनुसार
  5. परीक्षार्थींना वेळेचे नियोजन करण्याच्या दृष्टिने सराव
  6. राज्य व जिल्हानिहाय आपली रॅकिंग तपासण्यास वाव
  7. शिक्षण क्षेत्रातील विविध घडामोडी व संपूर्ण अद्यावत माहिती

सराव परीक्षा वेळापत्रक

Sr. No.

Exam Name

Mock Exam Date

1

MHT-CET (PCM)

06th August 2022

2

MHT-CET (PCB)

07th August 2022

3

JEE (Main)

19th July 2022

4

NEET

15th July 2022


Registration Form


Loading...