Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान

PUBLISH DATE 10th June 2022

आपलीच मुलं असतात मात्र आपण त्यांना कितपत ओळखत असतो. त्यांच्याविषयी आपण छातीठोकपणे काय आणि किती सांगू शकतो? दोन्ही पालकांमधील गुण त्यांच्या पाल्यात उतरलेले असतातच.

त्याही पलीकडे जाऊन त्याच्याकडे काहीतरी जास्तीचं स्वतःच असं असतं. ते आपल्यापेक्षा वेगळ असं व्यक्तिमत्त्व असतं. स्वतंत्र विचारांचं, स्वतंत्र कल असणारं. ते आपल्या प्रमाणेच असेल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. आपण आपल्या मुलाला समजून घ्यायला लागू तसंतस आपल्या हाती अनेक नवलाच्या गोष्टी लागण्याची शक्यता जास्त. अर्थात आपलंच मूल आपल्याला कितपत कळलं, समजलं?

आपलंच मूल आपल्यासमोर कोडं बनून हजर असतं. म्हणूनच त्यांना समजून घेणं हे आव्हानच आहे. समजून घेणं म्हणजे काय तर जाणून घेणं, आकलन होणं, ज्ञात होणं वगैरे. आपण आपल्या पाल्याबाबत छातीठोकपणे सांगू शकता का? उत्तर होय असेल तरच पाल्याला अधिकारवाणीने मार्गदर्शन करू शकता. तरंच त्यांचा विश्वासपण आपण सांगाल त्यावर बसेल. करिअर, शाखा, कॉलेज निवड या सगळ्या बाबतीत पालक म्हणून मार्गदर्शन करण्यापूर्वी आपल्याला त्याला समजून घेणं गरजेचं. पाल्याबाबत आपली जाण ही काही बोलण्यापूर्वी आवश्यक. ते करण्यासाठी पालक म्हणून आपण काय प्रयत्न केलेत? स्वतःमध्ये काही निरिक्षणक्षमता विकसित केल्या आहेत का? ते तपासा.

त्याच्यातील बलस्थान, त्रुटी, कमतरता याविषयी जाणून घ्या. अभ्यासातील कोणती गोष्ट मुलं अगदी सहजतेने आणि तन्मयतेने करतात ते पाहा, कोणती बाब करताना त्यांना नको वाटते, ती करण्याचा टाळाटाळ ते करतात ते सहज समजेल. यावरूनच त्यांची आवड-निवड समजायला सोपे जाईल.

त्यांच्या नित्य सवयी तुम्हीच लावलेल्या असतील, त्या कितपत अंगवळणी पडल्यात ते पाहा. अभ्यासातील चिकाटी, बैठक आणि सातत्य असेल तरच शास्त्र शाखेकडे वळावे. तिथे भरपूर वेळ अभ्यासालाच द्यावा लागतो. सवयी समजल्या तर मार्गदर्शनाचा फायदा होऊ शकतो. त्यांच्या खाण्यापिण्याच्या, खेळण्याच्या, टाइमपासच्या सवयी तपासून पाहणंदेखील महत्त्वाचं. ते काय छंद जोपासतात ते पाहा यातूनच त्यांच्या मनाचा कल, तयारी समजून घ्यायला मदत होईल.

आपल्या पाल्याचे मित्रमंडळ कोणत्या प्रकारचे आहे हे अनेक बाबींचे द्योतक असते. माणूस कोणत्या प्रकारच्या मित्रांबरोबर रहाणे पसंत करतो त्यावर त्याची आवड निवड समजत असते. मित्र हे जीवनात आवश्यकच असतात. वेळप्रसंगी मन मोकळा संवाद साधायला तेच उपयोगी पडतात. ज्या प्रकारचे मित्रसंबंध आपला पाल्य राखून आहे ती त्याची आनंद देणारी गोष्ट आहे. अर्थात, काही मित्र खेळापुरते तर काही अभ्यासापुरते असतात. फरक ओळखायला शिका म्हणजे झालं.

कोणत्या प्रकारच्या बातम्या आणि लेखन त्यांना वाचायला आवडत यावरूनही अनेक निर्णय ठरवता येतात. जे वाचतात तीच त्यांची वृत्ती बनत जाते. त्यास अनुषंगून करिअर मिळाले तर त्यातला आनंद ते घेतील आणि केवळ दिवस ढकलायचे म्हणून नोकरी करत बसणार नाहीत. मनमोकळा संवाद हा माणूस जाणून घेण्याचा मार्ग आहे. संवाद नसेल तिथे दुरावा वाढायला लागतो आणि मग परस्परांना समजून घेणं अवघड होऊन जातं. आपल्या पाल्याला समजून घेताना त्याच्याशी अनेक विषयावर बोला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं तो जे बोलतो आहे ते ऐका. त्याच म्हणणं ऐकून न घेताच एकतर्फी संवाद शक्य नसतो. समजुतीमध्ये तो अडथळाच असतो. आता हे अनेक वेळा सांगून झालेलं आहे की, आपलं म्हणणं त्यावर लादणं, थोपवणं थांबवा. एक मात्र निश्चित ते म्हणजे एक पालक म्हणून तुम्ही तुमच्या पाल्याच्या जडणघडणीत पहिले मार्गदर्शक आणि समुपदेशक आहात. त्याला तुमचा सल्ला महत्त्वाचा वाटला पाहिजे तसेच, तुम्ही त्याच्या निर्णयात त्याच्या पाठीशी आहात असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण व्हायला हवा. असे व्हावे असे वाटत असेल तर पाल्याला समजून घेणं पहिले.

लेखक -डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याला समजून घेणं एक आव्हान
28th November 2023

Career In Railways