Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग

PUBLISH DATE 5th October 2023

तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहात का? किंवा तुम्ही भविष्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर होऊ इच्छिता का? वेगवेगळ्या संगणकीय भाषांमध्ये कोड कसा लिहावा हे शिकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात का? तुम्ही कोड लिहिण्याची प्रक्रिया आणि पद्धती शिकताना, तसेच त्यातील त्रुटी म्हणजेच ‘बग्ज’ दूर करताना काही अडचणींचा सामना करत आहात का? तर मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या दैनंदिन कामकाजामध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या ‘चॅटजीपीटी/एआय युज केसेस’विषयी माहिती देणारा हा लेख अवश्य वाचा.

सॉफ्टवेअर कोड लिहिणे

तुम्ही तुमच्या आवश्यकतांनुसार फ्रंट एण्ड, बॅक एण्ड, मिडलवेअर, युआय/युएक्स किंवा अॅनालिटीकल टूल्स यांच्या अपेक्षित कार्यप्रणालीचे तपशीलवार वर्णन लिहून हव्या त्या भाषेमध्ये कोड लिहू शकता. यासाठी तुमच्या आवश्यकतांनुसार अत्यंत परिणामकारक आणि तपशीलवर प्रॉम्प्ट लिहिणे अपेक्षित आहे. एखादे मोठे सॉफ्टवेअर विकसित करताना एकच प्रॉम्प्ट देण्याऐवजी मोड्यूलनुसार प्रॉम्प्ट लिहिणे अधिक श्रेयस्कर असते.

कोडचे रूपांतर

आता डॉट नेटमधील कोड जावामध्ये किंवा एखादा कोड एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये रुपांतरीत करताना फार परिश्रम घेण्याची आवश्यकता नाही. आपल्याला हव्या असलेल्या भाषेमध्ये कोड मिळवण्यासाठी किंवा कोड अपग्रेड करण्यासाठी आधीचा कोड सिस्टीममध्ये अपलोड करणे आणि त्याला रुपांतरीत करणे हे काही मिनिटांचे काम आहे. त्याचबरोबर या कोडमध्ये स्वल्पविराम, कंस अशा व्याकरणाच्या चुकादेखील असणार नाहीत.

कोड डॉक्युमेंटेशन

सॉफ्टवेअरचे प्रत्येक मोड्यूल नेमके काय काम करते, कोणती माहिती देते, ते कशाप्रकारे माहितीवर प्रक्रिया करते ही सर्व माहिती ग्राहकाला देणे अनिवार्य असते. यालाच कोड डॉक्युमेंटेशन असे म्हणतात. चॅटजीपीटी/एआयमध्ये कोड लिहीत असतानाच कोड डॉक्युमेंटेशन करता येते. किंवा सध्या उपलब्ध असलेला कोड अपलोड करून देखील कोड डॉक्युमेंटेशन सहजपणे उपलब्ध होते. यापूर्वी कोड डॉक्युमेंटेशनसाठी डेव्हलपमेंट टीमचा १०-१५% वेळ आणि इतर प्रयत्न खर्ची पडत असत.

टेस्ट केस तयार करणे

एखाद्या अॅप्लिकेशनला टेस्ट करण्यासाठी चॅटजीपीटीच्या साहाय्याने टेस्ट केसेसची तपशीलवार यादी करता येते. अशा प्रकारच्या तपशीलवार यादीमुळे टेस्टिंग टीमचा बराचसा वेळ वाचतो. यापूर्वी त्यांना तासन् तास बसून इंटिग्रेशन टेस्टिंग आणि युनिट टेस्टिंगच्या युज केसेस लिहाव्या लागत असत.

बग निश्चित करणे

चॅटजीपीटीच्या साहाय्याने बग्ज शोधणे आणि ते दुरुस्त करणे हे अत्यंत सोपे झाले आहे. यापूर्वीचे डिबगर टूल कोडची प्रत्येक ओळ तपासणे, मार्करचा उपयोग करणे यासाठी बराच वेळ घेत असत. पारंपरिक टेस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये एखाद्या मोठ्या कोडमधील बग शोधणे आणि त्याला दुरुस्त करणे ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया असते. अशाप्रकारच्या मनुष्यबळाला विनाकारण खर्ची पाडणाऱ्या कार्यपद्धती बदलल्या जाऊ शकतात.

चॅटबॉट/टेक्निकल सपोर्ट

टेक्निकल सपोर्टचा पहिला स्तर ‘एआय’ आणि ‘एनएलपी’वर आधारित चॅटबॉटचा वापर करून ऑटोमेट करा. विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची संभाव्य उत्तरे समजून घेण्यासाठी चॅटजीपीटीचा उपयोग करून सिनॅरिओ तयार करता येतात. चॅटबॉट तयार करणे आणि चार ते पाच ओळींचा कोड लिहून तो आपल्या अॅपमध्ये समाविष्ट करणे यासाठी ‘डायलॉग फ्लो’सारखी टूल्स वापरली जाऊ शकतात.

चांगले प्रॉम्प्ट लिहिणे आणि त्यांना अधिक तपशीलवार बनवणे ही चॅटजीपीटी वापराची गुरुकिल्ली आहे. यालाच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असेही म्हणतात. हे अत्यंत उपयोगी टूल प्रभावी आणि कार्यक्षमतेने वापरण्यासाठी चांगले प्रॉम्प्ट लिहिणे अत्यंत आवश्यक आहे.

लेखक -अंकित भार्गव

 

 

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
28th November 2023

Career In Railways