Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी

PUBLISH DATE 11th October 2023

आपल्या समाजात सर्वत्र विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन होत असते. त्याच्या यशस्वितेसाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक असते. या व्यवस्थापनालाच इंग्रजीत ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ म्हणतात. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सण, समारंभ, कॉन्फरन्स, विवाहसोहळा, मैफली, संमेलन, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत महोत्सव आदी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.

कार्यक्रमाच्या योग्य नियोजनासाठी वैयक्तिक व अनुभवी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी किंवा फर्मची नेमणूक केली जाते. त्याद्वारे कार्यक्रमांचे आयोजन-नियोजन, संचालन केले जाते. कॉर्पोरेट गुडविल हे या प्रभावी इव्हेंट मॅनेजमेंटवर अवलंबून असते.

इव्हेंट मॅनेजर हा अनुभवी कुशल कार्यक्रम व्यवस्थापक असतो. इव्हेंट मॅनेजरकडे प्रशिक्षित व कार्यक्षम कर्मचारी वर्ग व व्हेंडर्सचे नेटवर्क असते. अनेक कार्यक्रमांचा आयोजनाचा अनुभव व कौशल्य असते. कार्यक्रमात येणाऱ्या अडी-अडचणीची जाणीव व अडचणीतून मार्ग काढण्याची क्षमता असते.

लोकांच्या व ग्राहकांच्या गरजा व सवयी, शिष्टाचार वगैरेची चांगली माहिती व त्यांना समाधानी ठेवण्याची कला अवगत असते. इव्हेंट मॅनेजमेंटची गरज व महत्त्व वाढले आहे. विविध सार्वजनिक आणि वैयक्तिक कार्यक्रमांपासून कार्यालयीन-कॉर्पोरेट कार्यक्रमापर्यंत इव्हेंट मॅनेजर मोलाची भूमिका पार पाडतात.

इव्हेंट मॅनेजरच्या कार्याची व्याप्ती ही मोठी आहे. हे आकर्षक आणि चांगले व्यावसायिक करिअर आहे. कार्यक्रमाचे यश इव्हेंट मॅनेजरमधील चांगल्या गुणांवर अवलंबून असते. इव्हेंट किंवा कार्यक्रमांची लेखी ऑर्डर स्वीकारणे, करार करणे, कार्य निश्चित करणे, प्रोजेक्टची निवड व आराखडा तयार करणे, प्रोग्राम व्हिजन, प्रायोजकत्व, ग्राहकाच्या हिताचे रक्षण करणे, टीमवर्क, जाहिरात करणे, फंड्स उभारणे, हिशेब ठेवणे, केटरिंगची व्यवस्था करणे, स्वागत कक्ष उभारणे, सुरक्षा व्यवस्था, प्रकाशयोजना, पार्किंग व्यवस्था, वेगवेगळे सरकारी परवाने काढणे इत्यादी जबाबदारी इव्हेंट मॅनेजरला पार पाडावी लागतात.

उपयुक्त कोर्स

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये दहावीनंतर सर्टिफिकेट कोर्स, बारावीनंतर डिप्लोमा, बी.बी.ए. डिग्री, तसेच पदवीधारकांना एम.बी.ए. इन इव्हेंट मॅनेजमेंट करता येते.

डिप्लोमा/बी.बी.ए., एम.बी.ए. कोर्समध्ये पुढील विषयांचा समावेश होतो.

१) इव्हेंट बजेटिंग आणि प्लॅनिंग

२) मार्केटिंग मॅनेजमेंट

३) इव्हेंट प्रॉडक्शन आणि केटरिंग

४) प्रिन्सिपल्स ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट

५) लिगल ॲसपेक्ट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट

६) बिझनेस कम्युनिकेशन

७) प्रोजेक्ट मॅनेजमेंट

८) मीडिया मॅनेजमेंट सॉफ्ट स्किल

९) क्रिएटिव्ही कन्सेप्ट

१०) बिझनेस डेव्हलपमेंट अँड क्लाएंट सर्व्हिस

अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या यामध्ये कार्यरत असून, रोजगाराच्या संधीही उपलब्ध आहेत.

- प्रा. सुभाष शहाणे

 

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
28th November 2023

Career In Railways