हल्लीचं युग कौशल्याधिष्ठित आहे, असं म्हटलं, तरी ते फार वावगं ठरणार नाही. सॉफ्ट स्किल, म्हणजे ज्ञान किंवा पुस्तकी शिक्षण हे हल्लीच्या काळात पुरेसं ठरणार नाही. नोकरी मिळवण्यासाठी, उद्योगात प्रगती करण्यासाठी किंवा स्वतःचे करिअर घडवण्यासाठीही केवळ पदवी पुरेशी नसते. तुमच्या क्षेत्राशी निगडित असलेली विविध कौशल्ये तुम्ही आत्मसात करणे अनिवार्य झाले आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही भाषाविषयक क्षेत्रात काम करू पाहत असाल, तर केवळ कला शाखेची पदवी पुरेशी नाही. तुमच्यात स्वतंत्र लेखन, संभाषण, अनुवाद, विश्लेषण, शब्दांकन, संपादन, मुद्रितशोधन यांपैकी काही कौशल्ये असणं आवश्यक ठरतं. अन्यथा केवळ गुणपत्रिकेवरील गुण पाहून नोकरी किंवा कोणतेही काम मिळेलच याची शाश्वती नाही.
सॉफ्ट स्किल्स शंभरहून अधिक प्रकारचे आहेत. ते विविध क्षेत्रांसाठी आवश्यक आहेत. ही सगळी कौशल्ये माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठीच आहेत आणि त्यांचा उपयोग त्याला व्यावसायिक जगतातही होऊ शकतो. आपल्यात असलेली कौशल्ये ओळखणं, त्यांचा विकास करणं आणि त्याहून वेगळी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करणं ही सध्याच्या काळातील यशाची त्रिसूत्री आहे, असं म्हणायला हरकत नाही.
प्रत्येक क्षेत्रासाठीची गरज म्हणून वेगवेगळी कौशल्ये असली, तरी सर्वसाधारणपणे काही मूलभूत कौशल्ये आत्मसात करणं आवश्यक आहे. त्यापैकी काहींचा थोडक्यात आढावा घेऊ या -
सवय अभ्यासाची
आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या विषयाचा अभ्यास करत असतोच. मात्र, केलेला अभ्यास लक्षात न राहणं, यश न मिळणं, ऐन वेळी न आठवणं असे प्रकार नेहमी घडतात. याचं कारण विद्यार्थी अभ्यास कौशल्यांबाबत अनभिज्ञ असतात.
अभ्यास कौशल्यामध्ये वाचन, लेखन, श्रवण, आकलन, साठवण, विश्लेषण, कल्पकता, सादरीकरण यांचा समावेश होतो. केवळ घोकंपट्टी न करता ‘स्मार्ट’पणे अभ्यास केल्यास निश्चितच कमी वेळात अपेक्षित यश मिळेल.
निर्णयक्षमता
परिस्थितीनुरूप योग्य निर्णय घेणं हेदेखील कौशल्यच आहे. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलवू शकतो. मात्र, चुकीच्या वेळी चुकीचा निर्णय घेतल्यास त्याची किंमत तुमच्या कंपनीला आणि पर्यायानं तुम्हालाही चुकवावी लागू शकते. अगदी छोट्या कौटुंबिक कार्यक्रमाचं नियोजन करण्यापासून मोठ्या ‘कॉर्पोरेट इव्हेंट’पर्यंत सगळीकडं हे लागू पडतं.
कॉर्पोरेटविश्व
जास्त पगार, मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि चकाचक लाइफस्टाइल यांमुळं तरुणाईला कॉर्पोरेट कंपन्यांची भुरळ आहे. मात्र, त्या विश्वात प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडं विविध सॉफ्ट स्किल्स असायला हवीत. वेगळा विचार करण्याची क्षमता, संवेदनशीलता, व्यावसायिक व वाणिज्यविषयक भान, सोर्सिंग ॲण्ड कंट्रोलिंग नेटवर्किंग, जनसंपर्क, व्यवस्थापन, विश्लेषणात्मक विचारपद्धती, सर्व्हायव्हल स्किल्स या प्रकारची कौशल्ये असली, तरच तुम्ही त्या क्षेत्रात टिकू शकता.
नेतृत्वगुण
टीम लीडर होण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, ‘जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण,’ हे या प्रसंगी विसरता कामा नये. तुमच्या टीममधील सर्व सहकाऱ्यांची बलस्थाने आणि त्यांच्या उणिवा ओळखून त्यानुसार त्यांना काम देणं आणि ते पूर्ण करून घेणं, ही तुमची जबाबदारी असते.
सहकाऱ्यांमधील संवाद, त्यांचे प्रश्न, नव्या संकल्पना, डेडलाइन्स या सर्व बाबी सांभाळून पुढं जात राहणं आवश्यक असतं. युद्ध करावं लागतं आणि ते जिंकावं लागतं, पण वरिष्ठांनी ते जिंकलं असं सैनिकांनी मानावं लागतं, हा विचार कायमच नेतृत्वाबद्दल सांगितला जातो. तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी आणि सहकाऱ्यांचा विश्वास यातूनच तुमच्या नेतृत्वाचं मोजमाप होऊ शकतं.
-----------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
Career Opportunities in Psychology
विद्युत अभियंता होताना...
इंटरव्ह्यूला जाताय ? .... कशी करावी तयारी ..?
कार अॅक्सेसरीज डिझायनर बनायचंय ?
छत्रपती संभाजीनगरमध्ये २१०० शाळांमध्ये स्टेम ग्रंथालय
‘ॲक्चुरिअल सायन्स’मधील करिअर
वाणिज्यमधील ‘एसीसीए’चा पर्याय
NEET MDS Counselling 2024
JoSAA Counselling 2024
करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी
Best Career Options In 2024
JoSAA Counselling 2024:
व्यवस्थापन क्षेत्रातील करिअर संधी
Career Options : बारावीनंतर विद्यार्थ्यांचे मिशन ॲडमिशन
Career Opportunity
बोला, अधिक आत्मविश्वासाने!
शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘लॉ’मधील करिअर
बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी
Fashion Designing Course in Abroad
‘नर्सिंग’मधील करिअर
नोकरीच्या मुलाखतीचे ‘डूज अँड डोंटस्’
Top 5 Career In Pharmacology
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य