Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा

PUBLISH DATE 20th September 2023

कोणीही कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो. माझ्यासाठी गाणं हे कम्फर्ट झोन आहे. कोणासाठी एखादा खेळ, कोणासाठी एखादा विषय, एखादी गोष्ट किंवा कला आपल्या बलस्थानाचा भाग असतो. आपले शक्तिस्थान असते.

एखादी गोष्ट म्हणजे गाणे कम्फर्ट झोनमध्ये असणे चुकीचे नाही, परंतु आयुष्यभर फक्त गाणार बाकी अन्य काही करणार नाही, हे चुकीचे असून आत्मघाती ठरते. आयुष्य फुलवायचे असते, जगायचे असते.

विविध अनुभवांनी समृद्ध करायला पाहिजे. आयुष्य रंगबेरंगी करायचे असल्यास सर्व रंग भरायला नको का? मला फक्त काळाच रंग आवडतो अन्य सर्व रंगांकडे मी बघणार नाही, असे ठरवले तर आयुष्य रंगबेरंगी कसे होईल?

आणि आयुष्य फुलवायचे असेल तर फक्त कन्फर्ट झोनमध्ये राहून कसे चालेल? कम्फर्ट झोन सोडून जगावेच लागेल. परंतु कित्येक माणसे शक्यतो असे करत नाहीत. याचे सगळ्यात महत्त्वाचा कारण म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये बलस्थाने असतात अशी त्यांची धारणा असते.

त्या गोष्टी केल्या तर लोक आपल्याला हसणार नाहीत, चुकीचे मार्गदर्शन करणार नाहीत याची खात्री असतो. परंतु लोकांसाठी आपण किती दिवस जगणार? तसेही सर्व गोष्टी आपण अनुभवत नाहीत, स्वतःला फुलवून बघत नाहीत तोपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आपण सर्वोत्तम आहोत, हो कळणार कसे?

मी आयआरएस झाले तेव्हा मला गाण्यांचा अल्बम करायची खरंचच आवश्यकता नव्हती. अल्बममधील एका गाण्यावर मला अभिनय करायला सांगितला. मला तेही करायची खरोखरच गरज नव्हती. मी असिस्टंट कमिशनर होते आणि लोक मला हसू शकत होते. परंतु तरीही मी तो प्रयत्न केला.

त्या गाण्यावर अभिनय करताना माझ्या हे लक्षात आले की आपण ही बाब करू शकतो. त्यानंतर मला अनुपम खेर अॅकाडमीमधून डिप्लोमा करावासा वाटला. त्याचीही अजिबात आवश्यकता नव्हती. मात्र अवयवदान विषयावर मी शॉर्ट फिल्म लिहिली आणि त्यात अभिनयही केला.

माझ्याकडे कोण कसे पाहिल याची प्रत्येक वेळी भीती वाटत होती. परंतु मी आवडीला महत्त्व दिले लोक काय म्हणतील याला नाही. आवश्यकता नसली, कोण काय म्हणेल याची भीती असली तरी अशा मनाला भावतात त्या गोष्टी करतो का?

आपण खरंच स्वतःवर प्रेम करतो का? स्वतःला संधी देतो का? आयुष्याला समृद्ध करू शकतो का? कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आपण आयुष्याची मजा घेऊ शकतो का? या प्रश्नांवर विचार करा.

- सोनल सोनकवडे

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी,गीतकार, गायिका आहेत.)

-----------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
28th November 2023

Career In Railways