Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा

PUBLISH DATE 13th June 2022

सध्याच्या काळात मूलभूत विज्ञान व संशोधन क्षेत्रात विपुल संधी आहेत.

अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखांपलीकडे फार मोठे विश्‍व आहे याची बहुसंख्य विद्यार्थ्यांना माहितीच नसते. दहावी, बारावीला चांगले गुण मिळवून कशी घसघशीत पगाराची नोकरी मिळवायची, या एका विचाराने भारावून गेलेल्या बहुतेक पालक आणि मुलांचा हाच विचार असतो. यात काही गैर नाही. मात्र, विद्यार्थ्याला काय आवडते आणि या दोन शाखांव्यतिरिक्त कोणते विकल्प आहेत, त्याचेच हे प्रबोधन. आपल्याकडे गुगल, अ‍ॅपल का नाही, त्यांच्याकडे काम करण्यातच आपण धन्यता का मानतो? याची उत्तरे शोधण्यासाठी चाकोरीबद्ध सेवावर्धित विचारांपलीकडे जाऊन ज्ञानवर्धित अर्थव्यवस्थेसाठी म्हणजेच समाजासाठी संशोधनाची वाट धरायला हवी.

संशोधनाचे महत्त्व

आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही सेवाधिष्ठित क्षेत्राकडे वाटचाल करत आहे. परंतु कोणत्याही क्षेत्रात तग धरून राहण्यासाठी ज्ञानवर्धित अर्थव्यवस्था असणे गरजेचे आहे. त्यासाठी संशोधन हा मूळ पाया आहे. मात्र आपल्या शिक्षण पद्धतीत तुलनेने संशोधनाला तितके महत्त्व दिले जात नाही. खरेतर बारावीनंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये संशोधन या विषयाची अगदी जुजबी माहिती विद्यार्थ्यांना होते. मुळात बारावीनंतर आपला कल कोणत्या विषयाकडे आहे, हे निश्‍चितच झालेले नसते.

पदवी अभ्यासक्रमात म्हणूनच अभ्यासाबरोबरच संशोधनालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. याच ‘अभ्यासाधिष्ठित संशोधन’ उद्देशाने २००६ मध्ये आयसरची स्थापना करण्यात आली. विद्यार्थिकेंद्रित अभ्यासक्रम हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. तुमच्या आवडीचा विषय व अभ्यासक्रम मिळाला तरच अभ्यास सहजपणे व चांगला होतो व यश हे निश्‍चितच मिळते याच उद्देशाने मूलभूत नैसर्गिक विज्ञान शाखांमधील पदवी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.

प्रवेश घेताना...

विज्ञान अभ्यासक्रम म्हटले की, केवळ अभियांत्रिकी व वैद्यकीय असा अनेक विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो; परंतु प्रत्यक्षात मात्र विज्ञान अभ्यासक्रमांतर्गत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, जैवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूगर्भशास्त्र, खगोलशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, भूभौतिकशास्त्र, भूरसायनशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी बारावीनंतरच्या पाच वर्षांच्या अभ्यासानंतर मिळते किंवा इंटिग्रेटेड पदवी घेता येते. या संस्थेमध्ये प्रवेशासाठी तीन वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांद्वारे प्रवेश दिला जातो.

 

लेखक- डॉ. अरविंद नातू

 

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: आवडीचे विकल्प निवडा
28th November 2023

Career In Railways