दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर खूप सारे मार्ग समोर असतात.
परंतु कोणत्या मार्गावर पाऊल ठेवावं हा मोठा प्रश्नचिन्ह असतो. करिअर निवडणे हा जीवनातील महत्त्वाचा निर्णय असून तो हलकेपणाने करू नये. कोणते व्यवसाय तुमच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांसाठी योग्य आहेत, त्या पर्यायांचा अभ्यास करा, उपलब्ध असल्यास त्या क्षेत्रातील लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी योजना करा.
शालान्त परीक्षा झाल्यानंतर कोणती वाट निवडू? शास्त्र शाखेला जाऊ की वाणिज्य शाखा निवडू? की कला? कॉम्प्युटर, ॲनिमेशन, कोणत्या शाखेला गेल्यावर मला भविष्यात काय होता येईल? कुणाला विचारावे? प्रश्न नुसते डोक्यात पिंगा घालत असतील तुमच्या आणि तुमच्या मुलांच्यापण.
काय करावे कोणत्या वाटेने जावे, भविष्यात मुलांना सुखाचे, समाधानाचे जगता यावे यासाठी असे आत्ता काय करावे लागेल या विचारांनी तुम्ही अगदी त्रस्त झाला असणार.
पालकांना आणि मुलांना/मुलींना त्यांचे भविष्य दिसायला लागले असेल. अनेक वाटा दिसत आहेत पण निवड मात्र एकाचीच करायची आहे. आता खरी परीक्षा जीवनाची. जसे शालांत परीक्षांचे निकाल जवळ यायला लागतील तशी मनाची अवस्था अगदी अवघड होऊन जाइल.
पण हिच वेळ आहे विचार करण्याची, ठरवण्याची, निर्णय घेण्याची. पण हे कसे साधायचे? समुपदेशन, मार्गदर्शन कसे मिळवावे हे शोधायला हवे. हे सांगणारी अनेक व्यावसायिक मंडळी आहेत, पैसे घेउन ते तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. मात्र निर्णय मात्र तुमच्या मुलांना आणि तुम्हालाच घ्यायचा आहे. म्हणूनच हा सल्ला. मोलाचा, महत्त्वाचा.
पालकांनो, काय कराल ?
आपल्या पाल्याशी मोकळेपणाने त्याच्या भविष्याविषयी चर्चा करा. बोला आणि त्याला व्यक्त व्हायला लावा. तुमचे विचार आवडी निवडी मुलांवर लादू नका. तुमच्या आवडीपेक्षा त्यांची आवड वेगळी असणार. कारण ते एक वेगळे व्यक्तिमत्त्व आहे हे लक्षात ठेवा.
आपल्या शिवाय आपल्या मुलाला कोण चांगले ओळखु शकणार? गप्पांची मैफील सजु द्या आणि नकळत आपल्याच आपत्त्याचे परीक्षण करा आणि त्याला काय झेपणार आहे ते ओळखा. आपल्या पाल्यामधिल असणारी कौशल्ये, क्षमता, . आवड वेळीच ओळखा, त्यावर आधारित शाखा निवडणं केव्हाही फायद्याचे. म्हणूनच काही प्रश्न जे तुमची चर्चा योग्य मार्गावर नेऊन सोडेल.
विद्यार्थी मित्रांनो, काय कराल?
करिअरविषयी मार्गदर्शन आणि समुपदेशन अवश्य मिळवा. परंतु अगदी सहजपणे टाळता येतील असे काही दबावाचे विषय तरी टाळा. मित्रांचे अनुसरण करणे आणि ज्या शाखेला गर्दी होते आहे ते टाळलेले बरे.
ही सर्वांत सामान्य चुकांपैकी एक आहे जी बहुतेक विद्यार्थी नकळत करतात. बरेच विद्यार्थी कोणताही वाट निवडतात कारण त्यांच्या मित्रांनी ती शाखा घेण्याचे ठरवले आहे. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत वाईट निर्णय ठरू शकतो.
बहुतेक विद्यार्थी जे करत आहेत ते करण्यापेक्षा तुम्हाला ज्या प्रवाहाची आवड आहे तो प्रवाह निवडणे आवश्यक आहे. केवळ आपले मित्र काय करत आहेत यावरून निर्णय घेऊ नका. त्यासाठी तुम्हाला मिळणारे विविध विषयातील गुण तुम्हाला सुचित करत असतात.
अनेक वेळा पालक/सामाजिक दबाव हा चुकीच्या निर्णयाला कारणीभूत ठरू शकतो. आपले शेजारी, नातेवाईक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय वाटते हे केव्हाही महत्त्वाचे. आवश्यक अशा ज्ञानाचा अभाव असला तर मात्र काय निवडावे हे कळणे अवघड होऊन बसते. दहावी नंतर करिअरचे अनेक पर्याय आहेत.
आपण दहा-वीस वर्षांपूर्वी मागे गेलो, तर निवडण्यासाठी करिअरचे फारच कमी पर्याय होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि योग्य करिअर मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशनाच्या मदतीने तुम्ही अंधारातून प्रकाशाकडे जाऊ शकता.
मुलींनी आपल्या भावी जीवनाचा विचार करून आपल्याला शक्य होईल अशाच शाखेची निवड करावी. नंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा हिच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. केवळ पळत्या गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा या विषयावर चिंतन, मनन करून वास्तविकते भान ठेवूनच निर्णय घ्या म्हणजे झालं.
लेखक- डॉ. उमेश दै . प्रधान
----------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
While deciding the career
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाची गरज
‘बीबीए/बीसीए’ला ‘सीईटी’ का?
Career Opportunities in Physiotherapy
UPSC Exam Preparation Tips
दातांचे डॉक्टर व्हायचंय?
Career In Fashion Designing
एनसीसी उमेदवारांना भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याची संधी
‘डिझाइन’मध्ये करिअर करायचंय?
माझी स्पर्धा परीक्षा: ‘प्लॅन बी’ वेळेत निश्चित करा
AI Trends 2024
वर्क फ्रॉम होम करायचे आहे? मग, ‘हे’ करिअर ऑप्शन आहेत बेस्ट
These are the top 5 Indian cities with highest employer intent
How To Prepare For NEET UG Along With Class 12 Board Exam
MPPSC Result 2019 Out
Skill Development Courses 2024
UPSC Free Coaching
Career Tips
एनआयटी एमसीए कॉमन प्रवेश परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणातही ‘एआय’चा समावेश!
स्पर्धेत धावण्यापूर्वी
जाहिरात क्षेत्रात करिअर करायचे आहे? मग, ‘हे’ कोर्सेस तुम्ही करायलाच हवेत
Career Tips
एमपीएससीची तयारी
डिजिटल मार्केटिंग - काळाची गरज
Career Options for Arts Stream
करिअर घडविताना : आर्किटेक्चरसाठी प्रवेश प्रक्रिया
नोकरीची संधी
स्पर्धेत धावण्यापूर्वी:कौशल्ये शिकणे गरजेचे
तुम्हाला Apple मध्ये जॉब कसा मिळू शकतो?
Career In Railways
करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे
UPSC-MPSC : समुद्राची पातळी वाढणे म्हणजे काय
कॉर्पोरेट कम्युनिकेटर बनायचंय? जाणून घ्या या क्षेत्रातील संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इंग्रजी अभ्यासानंतरच्या करिअरच्या वाटा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: पाठांतराच्या 'या' सोप्या टिप्स नक्की वाचा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विदेशात शिक्षणाची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आज अखेरची संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: फूटवेअर डिझायनिंगमध्ये उत्तम करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नऊ रंग करिअरचे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: स्पर्धा जिंकण्यासाठी ‘एआय’ आधारित मार्केटिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: खगोल भौतिकी प्रवेश परीक्षा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे क्षेत्र निवडताना
Career Guidance 2023: Important tips for UPSC Interview round
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरीसाठीच स्पर्धा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: करिअरची निवड करताना
विद्यार्थी पालक संवाद २०२३: इव्हेंट मॅनेंजमेंटमधील करिअर संधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ध्यानधारणा आणि अभ्यास
विद्यार्थी पालक संवाद २०२३: उच्च शिक्षण आणि मानसिक स्वास्थ्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवडीचे करिअर क्षेत्र
विद्यार्थी पालक संवाद २०२३: जॉईंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: एनडीएच्या परीक्षेची तयारी कशी करावी?
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सामाजिक मानसशास्त्र वृत्ती
विद्यार्थी पालक संवाद २०२३: चॅटजीपीटी/एआय/डिकोडिंग/कोडिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विपश्यना आणि जीवन
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट
विद्यार्थी पालक संवाद २०२३: एक्साइज इन्स्पेक्टर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ‘स्टेम’ क्षेत्रातील मुलींचे शिक्षण आणि प्रतिनिधित्व
विद्यार्थी पालक संवाद २०२३: तुम्हाला प्रश्न पडतात का?
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कौशल्याधिष्ठित जगाचा ‘स्किल्ड’ पासवर्ड
विद्यार्थी पालक संवाद २०२३: संवादाचं कौशल्य
विद्यार्थी पालक संवाद २०२३: गुगल कंपनीमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीची सुवर्णसंधी
विद्यार्थी पालक संवाद २०२३: हिंदी भाषेमधील करिअरचे पर्याय
महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट-अ’ पदांची भरती २०२३
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सांस्कृतिक उपक्रमावरील सहअभ्यासक्रम
SSC CGL Result 2023: CGL Tier 1 declared
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सर्वोच्च व्यावसायिक करिअर!
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
विद्यार्थी पालक संवाद २०२३: कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा
विद्यार्थी पालक संवाद २०२३: सकारात्मक बदलांच्या पाऊलखुणा
वाटा करिअरच्या २०२३: इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा
वाटा करिअरच्या २०२३: बी.टेक मध्ये सर्वाधिक प्लेसमेंट असलेले ट्रेड जाणून घ्या
वाटा करिअरच्या २०२३: पेंट टेक्नॉलॉजीमध्ये करिअर संधी
वाटा करिअरच्या २०२३: डिझास्टर मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर संधी
वाटा करिअरच्या २०२३: संगणकासह संलग्न शाखांकडेच कल
विद्यार्थी पालक संवाद २०२३: विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडथळे
विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणासाठी चेवनिंग शिष्यवृत्ती
विद्यार्थी पालक संवाद २०२३: बाह्य व्यक्तिमत्त्व
विद्यार्थी पालक संवाद २०२३: नर्सिंग वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम करिअर
विद्यार्थी पालक संवाद २०२३: ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग
वाटा करिअरच्या २०२३: फॅशन इंडस्ट्रीमध्ये नोकरीच्या चांगल्या संधी
वाटा करिअरच्या २०२३: नोकरीच्या चांगल्या संधीसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Indian Coast Guard Recruitment 2023