11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२१: प्रवेशाची विशेष फेरी जाहीर

PUBLISH DATE 17th September 2021

अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित फेऱ्यांनंतर आता प्रवेशाची विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे.

या फेरीतील प्रवेश यादी २२ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या तिन्ही फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळू न शकलेल्या, तसेच आतापर्यंत प्रवेश प्रक्रियेत सहभागी न झालेल्या, पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अशा सर्व विद्यार्थ्यांना विशेष फेरीत संधी मिळू शकणार आहे. तसेच पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘ब्लॉक’ करण्यात आले होते. अशा पद्धतीने आतापर्यंत ‘ब्लॉक’ केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेश फेरीत संधी मिळणार आहे. विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी संमती देणे गरजेचे आहे.

नवीन विद्यार्थ्यांसाठी नोंदणी, नवीन अर्ज भाग एक आणि दोन भरणे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे वेळापत्रक लवकरच जाहीर केली येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या विशेष फेरीचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

- विशेष फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविणे, ऑनलाइन अर्ज भरणे, अर्ज अद्यायावत करणे, अर्जाची ऑनलाइन पडताळणी करणे : १७ ते २० सप्टेंबर

- प्रवेशासाठी आलेल्या अर्जावरून गुणवत्ता यादी तयार करणे, निकषांनुसार अलॉटमेंट तयारी करणे (डेटा प्रोसेसिंग) : २१ सप्टेंबर

- विद्यार्थ्यांना महाविद्यालये ॲलॉट होणे, महाविद्यालयांना प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसणे, प्रवेश फेरीचा कट-ऑफ जाहीर होणे, प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एसएमएस जाणे : २२ सप्टेंबर

- महाविद्यालय ॲलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कालावधी, ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करणे, प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे : २२ ते २५ सप्टेंबर

- महाविद्यालयांनी प्रवेशाची माहिती संबंधित संकेतस्थळावर अपलोड करावी : २५ सप्टेंबर

- रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : २५ सप्टेंबर

-----------------------------------------------------------------------------------

Free Online Mock Test for 11th CET and MHT-CET, JEE, NEET

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News