11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: पहिल्या फेरीसाठी ३३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदविला पसंतीक्रम

PUBLISH DATE 25th July 2022

 पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी प्रवेशासाठी अर्जाचा भाग दोन नोंदवून कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यास सुरवात झालेली आहे.

या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तब्बल ३३ हजार २६९ विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले आहेत. विद्यार्थ्यांना आता पहिल्या नियमित फेरीच्या गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागली आहे. पुण्यातील ३१३ कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण एक लाख नऊ हजार ९९० जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी आतापर्यंत ९७ हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील केवळ ७५ हजार १६७ विद्यार्थ्यांनी अर्ज ‘लॉक’ केले आहेत.

अर्ज लॉक आणि प्रमाणित (व्हेराफाइड) झाल्याशिवाय विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन भरता येत नाही. आणि अर्जाचा भाग दोन भरल्यानंतरच प्रवेशाच्या नियमित फेरीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. आतापर्यंत ७० हजार ८९२ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित झाले असून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी अर्जाचा भाग दोन म्हणजेच महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येत आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा ३० मे पासून उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरता येत होता. तर शुक्रवारपासून (ता.२२) विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीसाठी महाविद्यालयाचा पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत अकरावीसाठी उपलब्ध जागांवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ६८ हजार १६१ विद्यार्थ्यांनी, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) एक हजार ३२९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचा आढावा

- ऑनलाइन नोंदणी केलेले विद्यार्थी : ९७,०२२

- लॉक केलेले अर्ज : ७५,०३४

- व्हेराफाइड अर्ज : ७०,८९२

- कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : ३१३

- एकूण प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १,०९,९९०

शाखानिहाय एकूण प्रवेश क्षमता

शाखा : प्रवेश क्षमता

कला : १६,४६०

वाणिज्य : ४४,२३५

विज्ञान : ४३,५३०

एचएसव्हीसी : ३,७३५

कोटानिहाय प्रवेश क्षमता

‘कॅप’ अंतर्गत प्रवेशाच्या जागा : ८४,०३९

इन हाऊस कोट्यातील जागा : ८,३७१

अल्पसंख्याक कोट्यातील जागा : ११,६०३

व्यवस्थापन कोट्यातील जागा : ३,९४७

बोर्डनिहाय अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या

बोर्ड : विद्यार्थी संख्या

एसएससी : ६८, २०१

सीबीएसई : १,३७०

आयसीएसई : ९८१

आयबी : ००

आयजीसीएसई : ५४

एनआयओएस : ९४

अन्य राज्य मंडळे : २७७

लेखक- मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

 

------------------------------------------------------------------------------
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org)
MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाईन सराव परीक्षा २०२२

१)    NEET- सराव परीक्षा - १५  जुलै २०२२
२)    JEE (Main) - 2022 - सराव परीक्षा - १९  जुलै २०२२
३)    MHT-CET - सराव परीक्षा - PCM- ०६ ऑगस्ट २०२२
   सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२

नाव नोंदणी लिंक: Mock Test Registration 

1) NEET-Mock Exam- 15th July 2022
2) JEE (Main) - 2022 - Mock Exam- 19 July 2022
3) MHT-CET - Mock Exam- PCM - 06 August 2022
    Mock Exam- PCB - 07 August 2022

Mock Test Registration 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News