11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

11th Admission : पाचवी विशेष फेरी निवड यादी जाहीर

PUBLISH DATE 11th September 2024

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष पाचव्या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले असल्यास, त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे आता विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष पाचव्या फेरीनंतर आणखी दोन विशेष प्रवेश फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्या संपल्यानंतर ‘दैनंदिन गुणवत्ता फेरी’ (डेली मेरीट राउंड-डीएमआर) आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील विशेष पाचव्या फेरीतील निवड यादी मंगळवारी जाहीर झाली. प्रवेशाच्या या टप्प्यात एटीकेटीची सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. या फेरीसाठी दोन हजार ४५६ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यातील दोन हजार ११ विद्यार्थ्यांना महाविद्यालये मिळाली आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या आणि पाच विशेष फेऱ्या झाल्या आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत ८३ हजार ३४५ जागा उपलब्ध आहेत. या जागांवर आतापर्यंत एकूण ६७ हजार ६०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याप २६ हजार ९४३ जागा रिक्त आहेत. पाचव्या विशेष फेरीसाठी ३७ हजार १५२ जागा उपलब्ध होत्या. या फेरीत दोन हजार ११ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहे.

या फेरीत प्रवेशासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत (ता. १४) प्रवेश निश्‍चित करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्‍चित करावा, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे. पुढील प्रवेश फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरणे ही प्रक्रियाही शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, कोटांतर्गत विषयांसाठीचे प्रवेश समांतरपणे सुरू राहणार आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनाही शनिवारी रात्री आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

विशेष पाचव्या फेरीत शाखानिहाय प्रवेश मिळालेल्यांची संख्या

शाखा - विद्यार्थ्यांची संख्या

कला -३१६

वाणिज्य- ८८६

विज्ञान -७२६

व्यावसायिक शिक्षण -८३

एकूण - २,०११

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा


Related News