11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

11 th Admission : अकरावी प्रवेशाचा कट ऑफ ९३ टक्क्यांवर

PUBLISH DATE 28th June 2024

नागपूर : अकरावीच प्रवेशाच्या पहिल्या फेरीमधील प्रवेशास सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी डॉ. आंबेडकर महाविद्यालय आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयासह नामांकित महाविद्यालयाला विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचे दिसून आले. विज्ञान शाखेत डॉ. आंबेडकरमधील प्रवेश ९३ टक्क्यांवर तर वाणिज्य शाखेचे प्रवेश ९० टक्क्यांवर संपले. याशिवाय शिवाजी विज्ञान महाविद्यालयातील अनुदानित तुकडीचे प्रवेशही ९० टक्‍क्यांवर संपले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत २०२४-२५ या वर्षासाठी इयत्ता ११ वी साठी ही ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रात घेण्यात येत आहे. अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २४ मेपासून सुरू झाली. नागपूर शहरातील १९६ महाविद्यालयातील ५३ हजार २३० जागांसाठी ही प्रवेश प्रक्रियेत ३८ हजार ५२६ जागा कॅप राऊंडद्वारे तर १४ हजार ७०४ जागा आरक्षण कोट्यातून भरल्या जाणार आहेत. यामध्ये पहिल्या कॅप फेरीसाठी १८ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी तर कोट्यासाठी ३ हजार ७९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी १ हजार २३२ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतले. गुरुवारी (ता.२७) पहिल्या फेरीतील १३ हजार २३१ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अलॉटमेंट देण्यात आले. त्यापैकी ४ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी प्रवेश घेतला. त्यातील १ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी कोट्यातून प्रवेश घेतला. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर आणि शिवाजी विज्ञान महाविद्यालयासह एलएडी, संचेती आणि इतर नामांकित महाविद्यालयांना पसंती दिली.

शाखेनुसार प्रवेश

शाखा एकूण जागा प्रवेश

विज्ञान २६,७५० : २,०९४

वाणिज्य १५,६६०: १,३६३

कला ७,७४० : ६४८

एमसीव्हीसी ३,०८०: २२०

एकूण ५३,२३०: ४,३६१

१ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावे

केंद्रीय प्रवेश समितीतर्फे विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहे. त्यानंतर प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी १ जुलै रोजी सायंकाळी ८ नंतर संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर दुसऱ्या प्रवेश फेरीच्या प्रवेशाच्या रिक्त जागा २ जुलै रोजी जाहीर केल्या जातील.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News