11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: अकरावीच्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी आजपर्यंत मुदत

PUBLISH DATE 27th August 2022

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विशेष फेरीचे नियोजन केले आहे.

शिक्षण विभागाने या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. रिक्त जागांवर प्रवेशासाठी होत असलेल्या या विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आजपर्यंत मुदत असेल. तर मंगळवारी (दि. ३०) निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने पार पडत असलेल्या अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत आत्तापर्यंत तीन नियमित फेऱ्या पार पडल्या आहेत. अजूनही निम्म्या जागा रिक्त असल्याने, या जागांवर प्रवेशासाठी शिक्षण विभागाच्या वतीने पहिली विशेष फेरी आयोजित केली आहे. आत्तापर्यंत अकरावी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी, अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

फेरीत सहभागासाठी विद्यार्थ्यांना आजपर्यंत मुदत दिलेली आहे. यानंतर दोन दिवस डेटा प्रोसेस करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मंगळवारी (दि. ३०) निवड यादी प्रसिद्ध केली जाणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २ सप्टेंबरपर्यंत मुदत उपलब्ध करून दिली जाईल.

तिसऱ्या फेरीत तेराशे प्रवेश
तिसऱ्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, या फेरीत १ हजार ३४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या यादीत २ हजार ९७२ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यापैकी १ हजार ३१६ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले होते. असे असतानाही प्रत्यक्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. आतापर्यंत अकरावीचे १३ हजार १२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

...अशी आहे स्थिती
कॅप राउंडसाठी उपलब्ध जागा २३, ३५९

कॅप राउंडमधून प्रवेश घेतलेले विद्यार्थी ११,७२८

कॅप राउंडसाठी रिक्त जागा ११,६३१

कोट्यातील उपलब्ध जागा ३,१२१

कोट्यातील जागांवर प्रवेश १,३९६

कोट्याच्या रिक्त जागा १,७२५

 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News