11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

11th Admission : अकरावीसाठी प्रत्येकाला मिळेल प्रवेश

PUBLISH DATE 31st May 2024

छत्रपती संभाजीनगर : विभागातील ४३० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची २ लाख २७ हजार ६८० एवढी क्षमता आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच विभागातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन सुरू झाली आहे. दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत भाग न घेता ग्रामीण भागातील महाविद्यालयांत प्रवेश घेत होते. त्यामुळे शहरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या घटत होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे दोन वर्षांपासून अकरावीसाठी ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यंदा विभागात दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ७४ हजार ५६ इतकी आहे. त्यात विज्ञान, वाणिज्य, कला आणि एमसीव्हीसीच्या एकूण २ लाख २७ हजार ६८० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जागा ४० टक्के जास्त आहेत. तसेच काही वर्षांपासून पॉलिटेक्निक व आयटीआय प्रवेशालाही पसंती मिळत आहे. त्यामुळे याहीवर्षी विभागातील अनेक महाविद्यालयांतील अकरावीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

दरवर्षी ग्रामीण भागातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश होतात. उपसंचालक कार्यालयाकडून याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिले जातात. मात्र, त्यानंतर संस्थाचालक आणि अधिकारी यातून ‘अर्थ’पूर्ण मार्ग काढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश घेतलेल्या एकाही कनिष्ठ महाविद्यालयावर कारवाई झाली नसल्याचे दिसून आलेले नाही.

दोन वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑफलाइन घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त अधिक प्रवेश घेऊ नयेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश असलेल्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा अधिकार उपसंचालक कार्यालयाला आहे.

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News