11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२२: अर्ज भरण्यासाठीच्या प्रक्रियेत बदल

PUBLISH DATE 17th May 2022

अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा (FYJC Online Admission 2022) विद्यार्थ्यांना सराव व्हावा, म्हणून अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांना आता २३ मेपासून अर्ज भरण्याचा (Mock Form Filling) सराव करता येणार आहे. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग (FYJC Form Part 1); तर २० जूननंतर अर्जाचा दुसरा भाग (FYJC Form Part 2) प्रत्यक्ष भरता येणार आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक (11th Admission Timetable) सोमवारी किंवा मंगळवारी जाहीर करणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, अशा दृष्टीने अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करून संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, दहावीचा निकाल २० जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेशासंदर्भात शाळा आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्बोधन वर्ग घेण्यात आलेले आहेत. यंदा यात भर म्हणून 'यू-ट्यूब' आणि 'फेसबुक लाइव्ह'द्वारे पालकांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन आणि एक विशेष फेरी राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्याऐवजी (एफसीएफएस) फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

कॉल सेंटरमधून मदत

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा, यासाठी विद्यार्थ्यांना २३ मेपासून संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज कसा भरायचा याचा सराव करावा. प्रवेशासाठीचे कॉलसेंटरदेखील त्याच दिवशी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कोणत्याही शंका किंवा अडचणी आल्यास कॉलसेंटरच्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहेत, असे अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या सदस्यांनी सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News