11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: विशेष गुणवत्ता यादी लवकरच

PUBLISH DATE 24th August 2022

अकरावी प्रवेशासाठीच्या (Fyjc Admission) केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी (Third Merit list) सोमवारी जाहीर करण्यात आली.

यामध्येही विज्ञान शाखेसाठी नामवंत कॉलेजांचा कटऑफ नव्वदीपार गेल्याने ८५ टक्क्यांवरील अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळू शकलेले नाही. तर, दुसऱ्या यादीत ज्या कॉलेजांचे कटऑफ ८० टक्क्यांपर्यंत आले होते, त्या कॉलेजांचे कटऑफही तिसऱ्या यादीत ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सुमारे ९२ हजार २४१ विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होऊ शकलेले नाही. या विद्यार्थ्यांना आता विशेष गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.


तिसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये एक लाख ४३ हजार ६०२ जागांसाठी एक लाख ४३ हजार ०१० अर्ज दाखल झाले होते. यापैकी ५० हजार ७६९ विद्यार्थ्यांना या यादीमध्ये कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. सुमारे १३ हजार ९२० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीमध्ये अवघ्या २४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेशनिश्चिती केल्यामुळे तिसऱ्या गुणवत्ता यादीतील स्पर्धा वाढली. परिणामी या यादीत कटऑफ वाढला आणि ७० ते ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमाच्या २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कॉलेज अलॉट झाले असेल व त्यांना या कॉलेजांमध्ये प्रवेश नको असेल तर ते विशेष फेरीसाठी पात्र ठरू शकतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे, त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागणार आहे. तिसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांनी २४ ऑगस्टला संध्याकाळी ६पर्यंत संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावेत, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोट्यातील जागा समर्पित व्हाव्यात
अकरावी प्रवेशासाठी इन हाऊस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक कॉलेजांतील कोट्यातील जागा तिसऱ्या फेरीनंतरही केंद्रीभूत कोट्यासाठी समर्पित झालेल्या नाहीत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज मिळू शकेलेले नाहीत. आता तिसऱ्या फेरीतील प्रवेशानंतर या जागा केंद्रीभूत कोट्यासाठी समर्पित होतील. यामुळे विशेष फेरीमध्ये या कोट्यासाठी प्रवेशासाठी जागा वाढू शकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शाखानिहाय अलॉटमेंट

शाखा उपलब्ध जागा अलॉटमेंट

कला २१,५४४ ४,३५७

वाणिज्य ७७,९०४ ३१,२५३

विज्ञान ४१,७८४ १४,८२४

एमसीव्हीसी २,३७० ३३५

एकूण १,४३,६०२ ५०,७६९

दुसऱ्या यादीतील कटऑफ


- एच. आर. कॉलेज : वाणिज्य-४८४

- एन. एम. कॉलेज : वाणिज्य-४७७

- सेंट झेविअर्स कॉलेज : कला-४७८, विज्ञान-४५२

- रुईया कॉलेज : कला-४६४, विज्ञान-४६७

- मिठीबाई कॉलेज : कला-४४६, वाणिज्य-४५२, विज्ञान-४३५

- के. सी. कॉलेज : कला-४३९, वाणिज्य-४५८, विज्ञान-४५३

- जयहिंद कॉलेज : कला-४६४, वाणिज्य-४५९, विज्ञान-४४८

- रूपारेल कॉलेज : कला-४५२, वाणिज्य- ४४३, विज्ञान-४६१

- साठ्ये कॉलेज : कला-४०३, वाणिज्य-४३७, विज्ञान-४५०

- डहाणूकर कॉलेज : वाणिज्य-४४९

- वझे केळकर कॉलेज : कला-४४९, वाणिज्य-४८५, विज्ञान-४७८

- मुलुंड कॉलेज : वाणिज्य-४७४

- बांदोडकर कॉलेज : वाणिज्य-४७१

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News