11th Admissions 2022-23

11th Admissions 2022-23

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: कोटा अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

PUBLISH DATE 29th July 2022

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये कोटांतर्गत अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यानुसार कोटांतर्गत यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारपर्यंत (३० जुलै) प्रवेश घ्यायचा आहे.

त्यानुसार पहिल्याच दिवशी ५३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजशी संपर्क साधून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या फेरीसाठी अर्ज पूर्ण भरण्यासाठीही ३० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महानगर क्षेत्रातील ३१३ ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रवेशासाठी एक लाख नऊ हजार १५० जागा उपलब्ध आहे. त्यानुसार ६५ हजार १०६ विद्यार्थ्यांनी बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत अर्जातील भाग दोन (गुण आणि कॉलेजांचे पर्याय) नोंदवले आहेत.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ‘लॉग इन आयडी’द्वारे ती दिसते. या यादीतील माहितीबाबत विद्यार्थ्यांना काही आक्षेप असल्यास, ते विद्यार्थ्यांना ३० जुलै सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवता येणार आहेत. ही यादी एकदाच प्रसिद्ध करण्यात येत असून, त्यानंतर प्रवेश यादी जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली माहिती तपासावी; तसेच त्याबाबतचे आक्षेप ऑनलाइन प्रणालीतून नोंदवायचे आहेत, असे समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.

तीन ऑगस्टला प्रवेश यादी
या प्रवेशप्रक्रियेत एक लाख ७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली, तरी अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरणाऱ्या ६५ हजार १०६ विद्यार्थ्यांचा विचार प्रवेशप्रक्रियेत होणार आहे. या विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरल्यानंतर, अर्ज लॉक करणे गरजेचे आहे. अर्ज लॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेत विचार होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत पाच शहरांमधील ११ हजार ९३० विद्यार्थ्यांचा अर्ज प्रमाणित न झाल्याने, त्यांना अर्जाचा भाग दोन भरता आलेला नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेत अर्ज नव्याने भरण्याला; तसेच अर्जाचा भाग दोन भरून लॉक करण्याला ३० जुलै सायंकाळी सहापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार प्रवेश यादी तीन ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर, यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना सहा ऑगस्टपर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे समितीने सांगितले.

 

------------------------------------------------------------------------------
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP), पश्चिम महाराष्ट्र व विद्यार्थी मित्र (VidyarthiMitra.org)
MHT-CET, JEE, NEET मोफत ऑनलाईन सराव परीक्षा २०२२

१)    NEET- सराव परीक्षा - १५  जुलै २०२२
२)    JEE (Main) - 2022 - सराव परीक्षा - १९  जुलै २०२२
३)    MHT-CET - सराव परीक्षा - PCM- ०६ ऑगस्ट २०२२
   सराव परीक्षा- PCB- ०७ ऑगस्ट २०२२

नाव नोंदणी लिंक: Mock Test Registration 

1) NEET-Mock Exam- 15th July 2022
2) JEE (Main) - 2022 - Mock Exam- 19 July 2022
3) MHT-CET - Mock Exam- PCM - 06 August 2022
    Mock Exam- PCB - 07 August 2022

Mock Test Registration 

------------------------------------------------------------------------------------------------------------------
VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.