11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२: २० जुलैनंतर पहिली गुणवत्ता यादी

PUBLISH DATE 16th July 2022

महाराष्ट्र राज्याच्या स्टेट बोर्डाने दहावीचा निकाल १७ जून रोजी जाहीर केला आहे.

पण, ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल अजूनही जाहीर झाला नसल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे गुणवत्तेत पिछाडीवर राहिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून महाविद्यालये सुरू करण्याचे नियोजन त्यामुळे रखडले आहे. जिल्ह्यातील तब्बल ८२ मुलांचे अकरावी प्रवेश अजूनही झालेले नाहीत. सोलापूर शहर-जिल्ह्यात अकरावीचे ४१६ महाविद्यालये आहेत. त्याअंतर्गत विज्ञान शाखेला सर्वाधिक ३२ हजार प्रवेश क्षमता असून, त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता २३ हजार ५०० आहे. व्यावसायिक व तंत्रशिक्षणची प्रवेश क्षमता दोन हजार ८० एवढीच आहे.

मागील काही वर्षांत बहुतेक विद्यार्थी वाणिज्य किंवा विज्ञान शाखेलाच पसंती देत आहेत. दरवर्षी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन-चार दिवसांत त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण, यंदा एसएससी बोर्डाचा निकाल लवकर जाहीर झाला. ‘सीबीएसई’ बोर्डाचा निकाल १६ जुलैपर्यंत अपेक्षित होता. त्यामुळे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबविले होते. पण, निकाल अद्याप जाहीर न झाल्याने आणखी किती दिवस प्रवेश प्रक्रिया थांबवायची, याचे विचारमंथन सुरू आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी आता राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे. पुढील आठवड्यात राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आदेश किंवा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना मिळतील, अशी आशा आहे.

पहिली गुणवत्ता यादी २० जुलैनंतर

२० जुलैपर्यंत ‘सीबीएसई’चा निकाल जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीपूर्वी ‘सीबीएसई’चा निकाल अपेक्षित आहे. त्यावेळी सीबीएसई विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन त्यांना टक्केवारीच्या प्रमाणात संबंधित महाविद्यालयात थेट प्रवेश दिले जातील. सध्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाचे अर्ज दिले जात आहेत.

शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा

कोरोनामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा तथा अभ्यासक्रम डोईजड होऊ नये म्हणून अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. पण, आता कोरोनातून राज्य सावरला असून आगामी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानुषंगाने शिक्षकांनी अध्यापनाचे नियोजन केले असून, सध्या विद्यार्थ्यांचे अध्यापन त्यादृष्टीने सुरू केले आहे.

एसससी बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर झाला, विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटपही झाले; मात्र ‘सीबीएसई’चा निकाल अजून जाहीर न झाल्याने अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबविली आहे. निकालाची वाट पाहून काही दिवसांत प्रवेशाचा निर्णय घेतला जाईल.

- भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, सोलापूर

महाविद्यालये अन्‌ प्रवेशाची स्थिती

  • एकूण महाविद्यालये - ४१६

  • प्रवेश क्षमता - ७४,५८०

  • ‘विज्ञाना’ची प्रवेश क्षमता - ३२,०००

  • ‘वाणिज्य’ प्रवेश - २३,५००

  • ‘कला’ शाखेचे प्रवेश - १७,०००

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News