11th Admissions 2025-26

11th Admissions 2025-26

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांना अर्ज भाग २ लॉक करण्यासाठी ६ ते ७ जून दरम्यान विशेष संधी

PUBLISH DATE 6th June 2025

अकरावी प्रवेश :  विद्यार्थ्यांना अर्ज भाग २ लॉक करण्यासाठी ६ ते ७ जून दरम्यान विशेष संधी

पुणे, ता. ५ : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी नऊ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २१ लाख २३ हजार ०४० जागांपैकी तब्बल १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग २ भरून तो लॉक केला आहे.

पहिली अंतिम गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर होणार असून त्याआधी, तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) ०६ जून २०२५ रोजी दुपारी १:०० वाजेपर्यंत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अर्ज भरण्याचा कालावधी व स्थिती

इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याचा कालावधी २६ मे २०२५ ते ५ जून २०२५ असा होता. या कालावधीत ११,२९,९२४ विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही भाग (भाग १ व भाग २) पूर्ण केले आहेत.

विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या दोन महत्त्वाच्या शंका व स्पष्टीकरण

१. भाग १ लॉक केला आहे, पण भाग २ लॉक नाही:

  • जे विद्यार्थी फक्त भाग १ लॉक करून थांबले आहेत आणि भाग २ अजून भरलेला नाही, अशांसाठी ६ जून दुपारी १२:१५ ते ७ जून सकाळी १२:३० या कालावधीत अर्जाचा भाग २ भरून लॉक करण्याची अंतिम संधी दिली जाणार आहे.

  • जर विद्यार्थ्यांनी या कालावधीत भाग २ भरून लॉक केला नाही, तर Provisional Merit Listपहिल्या फेरीतील प्रवेश यासाठी त्यांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

  • यापूर्वी भाग २ लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार नाही.

२. अर्ज अद्याप भरलेला नाही किंवा अर्धवट भरलेला आहे:

  • जे विद्यार्थी नोंदणी करू शकले नाहीत, भाग १ भरलेला नाही, किंवा अर्ज अर्धवट राहिला आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक नवीन फेरीच्या सुरुवातीला भाग १ व भाग २ भरून अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे.

  • अशा विद्यार्थ्यांनी काळजी न करता पुढील फेरीत आपला अर्ज पूर्ण व वेळेत भरून लॉक करावा.

  • प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरायची संधी दिली जाणार असून, वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

  • शून्य फेरीतील गुणवत्ता यादी : ८ जून

  • शून्य फेरीतील प्रवेश : ९ ते ११ जून

  • पहिल्या नियमित कॅप फेरीची गुणवत्ता यादी : १० जून

  • पहिल्या कॅप फेरीतील प्रवेश : ११ ते १८ जून

नोंदणीचा आढावा (राज्यस्तरावर):

  • एकूण नोंदणी : १२,७१,२९५

  • भाग १ पूर्ण : १२,०५,१६२

  • भाग २ लॉक : ११,२९,९२४

  • शुल्क भरलेले : १२,१५,१९०

  • कॅप फेरीसाठी नोंदणी : १९,२९,९३२

  • इनहाउस कोटा अर्ज : ६४,२३८

  • व्यवस्थापन कोटा : ३२,७२९

  • अल्पसंख्याक कोटा : ४७,५७८

उपलब्ध जागा:

  • एकूण : २१,२३,०४०

    • कॅप फेरीअंतर्गत : १८,९७,५२६

    • कोट्यानुसार : २,२५,५१४

पुणे जिल्ह्यातील नोंदणी:

  • एकूण नोंदणी : १,१९,८५३

  • शुल्क भरलेले : १,१६,७५२

  • भाग १ पूर्ण : १,१५,४१६

  • भाग २ लॉक : १,०५,५५३

विद्यार्थ्यांनी वेळेत अर्जाची पूर्तता करून प्रवेश प्रक्रियेत सामील व्हावे. प्रवेश संकेतस्थळ : https://mahafyjcadmissions.in
 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.

 

 

 


Related News


अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांना अर्ज भाग २ लॉक करण्यासाठी ६ ते ७ जून दरम्यान विशेष संधी
12th June 2025

FYJC Quota Admission 2025

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांना अर्ज भाग २ लॉक करण्यासाठी ६ ते ७ जून दरम्यान विशेष संधी
8th May 2025

11th admission 2025-26