11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

11th Admission Process : प्रवेशाची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू

PUBLISH DATE 22nd May 2024

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल. या दिवसापासून अर्ज प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमधील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमार्फत होतील. त्यानुसार ‘मॉक डेमो’ नोंदणी अंतर्गत बुधवारी (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) डमी अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थी-पालक करू शकतील. शुक्रवारपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. पहिली विशेष फेरी झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील, अशी माहिती अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव आणि प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.मॉक डेमो’ नोंदणीद्वारे पोर्टलवर डमी लॉगिन सुविधा असेल. शुक्रवारपासून (ता.२४) पोर्टलवर प्रत्यक्ष अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.

कॅप’अंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा कालावधी

‘कॅप’अंतर्गत नियमित पहिली फेरी राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल आणि ती १० ते १५ दिवस चालेल. त्यानंतर नियमित दुसरी फेरी आणि तिसरी फेरी प्रत्येकी सात ते आठ दिवस राबविण्यात येईल. त्यानंतर दोन विशेष फेऱ्या होतील. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोट्यांअंतर्गत प्रवेश समांतर सुरू असतील. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेऱ्या, दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या होतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी यंदा होणार नाही.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी संकेतस्थळ : https://11thadmission.org.in/

प्रवेश प्रक्रियेचा तपशील

  • कार्यवाहीचे टप्पे : कालावधी

  • विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेणे : २४ मेपासून सुरू (दहावीच्या निकालापर्यंत)

  • उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी : २२ मेपासून

  • ‘कॅप’ फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे : दहावीचा निकालानंतर सुर

 

Register for Free Mock Test

------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नो
करी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News