11th Admissions 2025-26

11th Admissions 2025-26

FYJC Quota Admission 2025

PUBLISH DATE 12th June 2025

Maharashtra 11th Quota admission 2025 : राज्यातील केंद्रीय अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया रेंगाळत असल्याने, विद्यार्थी आणि पालक अस्वस्थ झाले आहेत. प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरीचे (कोटा प्रवेश) प्रवेश बुधवारी प्रसिद्ध होणार होते. मात्र, हे प्रवेश सुधारित वेळापत्रकानुसार आज, गुरुवारी (१२ जून) सकाळी नऊ वाजता कॉलेजस्तरावर जाहीर झाले आहेत. त्याची माहिती कॉलेजांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध झाली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर कॉलेजांनी विद्यार्थ्यांना संपर्क करून १४ जूनला सायंकाळी सहापर्यंत प्रवेश निश्चित करावा लागेल.

Maharashtra Std. 11th Centralised Online Admission Process 2025–26: राज्यातील सर्व ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी यंदा ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सातत्याने बदलत असल्याने, विद्यार्थी, पालकांसोबत शिक्षकही वैतागले आहेत. बुधवारी कोटांतर्गत (इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन) प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार होती. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे कोटा प्रवेशातून आपले प्रवेश जाहीर झाले का, याची माहितीच विद्यार्थ्यांना मिळाली नाही.

FYJC General Merit List 2025: याबाबत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाला अनेकांनी विचारणा केल्यामुळे, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास प्रवेश प्रक्रियेच्या माहितीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार कोटा प्रवेशाची यादी आज, गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात येईल. ही यादी कॉलेजांना त्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध असेल. कॉलेजांना यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संपर्क करावा लागेल. या यादीनिहाय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश कॉलेजांमध्ये १४ जूनपर्यंत निश्चित करावे लागतील. दरम्यान, विद्यार्थ्यांनाही प्रवेशाबाबत कॉलेजांना संपर्क करता येईल, अशी माहिती प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली होती.


अंतिम यादी पोर्टलवर दिसणार -
कोट्यांतर्गत प्रवेश घेणे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे. कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील फेऱ्यांमधून वगळण्यात येतील, असे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.

VidyarthiMitra Career Guidance

Admission Guidance 2024: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2024 |

We bring you the fastest and most relevant notifications on Bank, Railways, and Government Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2024 | JoSSA 2024 | MHT-CET 2024 | MBA 2024 | Pharmacy 2024 | Polytechnic 2024

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alerts on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send a WhatsApp message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) 77200 25900 हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहर> <नोकरी/शिक्षण> पाठवा.


Related News


FYJC Quota Admission 2025
8th May 2025

11th admission 2025-26