11th Admissions 2025-26

11th Admissions 2025-26

‘अकरावी’ ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

PUBLISH DATE 19th June 2023

कोल्हापूर : शहरस्तरीय अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास समितीने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उद्या (ता. १९) सायंकाळी पाचपर्यंत अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांची मागणी आणि सीबीएसई बोर्डाच्या काही विद्यार्थ्यांना अद्याप शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्याने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाणिज्य इंग्रजी माध्यम आणि विज्ञान विद्याशाखेच्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जातील दुसरा भाग भरण्यास १४ जूनपासून सुरुवात झाली. त्यात दिवसागणिक अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली.

या प्रक्रियेत अर्ज करण्याचा आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत मुदत होती. या मुदतीत एकूण सहा हजार ३८४ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले. त्यात विज्ञान विद्याशाखेचे पाच हजार २५६, तर वाणिज्य इंग्रजी माध्यमाच्या एक हजार १२८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत उद्या सायंकाळी पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला नाही. त्यांनी या मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीतर्फे करण्यात आले आहे.


Related News