Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड

PUBLISH DATE 8th June 2022

पालक म्हणून आपल्या पाल्याचा कल कोणत्या शाखेकडे, व्यवसायाकडे आहे हे आपण सहज ओळखू शकता आणि तसे मार्गदर्शनही देऊ शकता.

आपल्या पाल्यांचे व्यवस्थित निरिक्षण करा आणि त्या दृष्टीने त्याला भविष्य कशात करिअर घडवता येईल हे आपल्या त्याला समजून सांगता येईल. त्यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवायला नक्की याची मदत होईल. आवश्यकता आहे ते आपल्याच मुलांचे विचार, कल, आवड शोधण्याची. अर्थात एकदम मुलांना काही लेबल चिकटवणे योग्य होणार नाही परंतु दिशा नक्कीच सापडू शकते.

दैनंदिन जीवनात आपलीच मूल असे अनेक संदेश देत असतात, अगदी कळत नकळत. ते समजून घेतले तर ते कोणत्या व्यवसायाशी जोडायचे याचा मार्ग सापडू शकेल. त्यांच्या आवडीला अनेक वेळा आपण नाकारतो, पुस्तकी अभ्यासाला महत्त्व देत त्यांच्यातील मुक्त गुणांना आपण दोष देतो. जे त्यांना सहज जमणार आहे ते आपण त्याच्यापासून दूर ठेवतो. परंतु नेमकं त्यालाच प्रोत्साहन दिले तर एक वेगळाच विचार करून स्वयंपूर्ण अशी आपली मुलं होऊ शकतील.

निरिक्षण...

आमच्या प्रणवला बडबड करायला अतिशय आवडत. कोणत्याही विषयावर तो बोलू शकतो अगदी तासन् तास. प्रत्येक मुद्दा अगदी असा पटवून देतो ना की ऐकणारा गप्पच होतो.

निष्कर्ष...

  • त्याला कला शाखेकडे जायला सांगा. तो एक चांगला अध्यापक, राजकारणी, वकील नक्की बनू शकतो. त्याच्या बोलण्याला तिथे भरपूर वाव आहे.

  • आमच्या गायत्रीला चांगल्या डिशेस करायची अतिशय आवड आहे. खाणे आणि खिलवणे दोन्ही तिच्या आवडीचे. कोणतीही डिश पाहिली की हिने केलीच. कुकरी शोमध्ये तिला नेहमी पहिला क्रमांक मिळत असतो. तिच्या हाताला छान चव पण आहे हं.

  • हॉटेल मॅनेजमेंट ही सध्याच्या काळातील अगदी चलती असणारी शाखा आहे. सायन्समध्ये बारावी करून मग फूड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरींगकडे वळता येईल. फास्टफूड, डेअरी व्यवसायही अगदी जोरदार आहे.

  • शौर्यला मोबाईल आणि कॉम्प्युटर अगदी सोडवत नाही. त्याच्या इतका फास्ट की बोर्डपण कुणी चालवत नाही. कोणताही प्रोग्रॅम त्याला एकदम लवकर अवगत होतो. सगळा अभ्यासही त्याने कॉम्प्युटरच्या सहाय्यानेच केला.

  • स्पष्टच आहे त्याला कॉम्प्युटर संदर्भातील कोर्स करायला काहीच हरकत नाही. गणित आणि शास्त्र या विषयात रस असेल तर शास्त्र शाखेकडे जाऊन त्याला त्या शाखेतील इंजिनिअर होण्याकडेही वळता येईल.

  • स्नेहा मॉडेल्स तयार करण्यात एकदम तरबेज आहे. तिचं आर्ट आणि क्राफ्ट उत्तम आहेच. शिवाय रंगसंगती, निवड एकदम चांगली असते. अभ्यास न करता सगळा वेळ तिचा चित्र काढा, रंगवा असा टाइमपास सुरू असतो.

  • आर्किटेक्ट ही शाखा आवड आणि छंद यांना जपणारीच आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तिला चांगली संधी आहे.

  • आमच्या घरच वातावरण हे सगळ डॉक्टरी पेशाचेच. आमचे हे आणि मी स्वतः याच व्यवसायातले त्यामुळे अमेयला आत्तापासूनच सगळ माहीत असतं. काही बाबतीत त्याची मदत करणं सुरू असतं. तसा त्याचा अभ्यास बरा आहे. परंतु या प्रवेश परीक्षांनी वैताग आणलाय.

  • अमेय डॉक्टरच होईल असे अगदी सांगता येत नाही. स्पर्धात्मक जगामुळे तुमचे परीक्षेतले गुण हे महत्त्वाचे ठरतात. घरापासून लांब पाठवायची तयारी असेल तर कदाचित तुमचं स्वप्न साकार होईल. परंतु वैद्यकीय संबंधित अनेक कोर्सेस आहेत जे त्याला स्वयंपूर्ण बनवू शकतात. ते शोधायला हरकत नाही.

एकंदरीत काय तर तुमच्या मुलांचं निरिक्षण करा, आवड, आनंद शोधा आणि तुमचा शाखा, करिअर निवडीच प्रवास संपला असेच समजा.

लेखक - डॉ. उमेश प्रधान udpradhan@gmail.com


Related News


विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी-पालक संवाद २०२२: पाल्याचे निरीक्षण आणि करिअर निवड
28th November 2023

Career In Railways