Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज

PUBLISH DATE 10th June 2022

बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व इतर करिअर इच्छुकांपेक्षा वेगळे सिद्ध करणाऱ्या बुद्धिवादी वर्गामध्ये ‘करिअर मॅपिंग आणि करिअर प्लॅनिंग’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

मूलभूत अभ्यासक्रमाला पूरक कौशल्यांची रोजगारस्वरूप निहाय जोड म्हणजेच करिअर मॅपिंग. बदलत्या कौशल्यांमुळे सदर रोजगार क्षमतांचे स्वरूपातही मोठे परिवर्तन होते आहे. त्यामुळेच विशिष्ट कालावधीसाठी केलेले करिअर मॅपिंग ही ‘करिअर प्लॅनिंग’ची पहिली पायरी आहे.

मूलभूत अभ्यासक्रमांबरोबर त्याच्याशी निगडित पूरक कौशल्यांची जोड अन्य अभ्यासक्रम, प्रशिक्षण देणे म्हणजेच करिअर प्लॅनिंग. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बहुआयामी कौशल्य प्राप्त युवकांची आवश्यकता भासत असल्याने करिअर प्लॅनिंगला अनन्य साधारण महत्त्व आले आहे.

मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच व्यवस्थापन कौशल्य, माहिती तंत्रज्ञान कौशल्य, गुणवत्ता कौशल्य, परदेशी भाषा कौशल्यासह रोजगार क्षमतांक (एम्प्लॉयबीलीटी कोशंट) महत्त्वाचा असल्याने करिअर प्लॅनिंगची प्रक्रिया काळजीपूर्वक करणे अत्यावश्यक झाले आहे. अनेक शाखांमध्ये युवकांना या कौशल्यांची मूलभूत अभ्यासक्रमा बरोबरची बांधणी करण्यासाठी करिअर समुपदेशकांची मदत महत्त्वाची आहे. वैद्यकीय शाखेतील युवकास रुग्णालय व्यवस्थापन, हॉस्पिटल ई.आर.पी. सिस्टिम (माहिती तंत्रज्ञान कौशल्य), सर्टिफाईड क्वॉलिटी मेडिकल प्रोफेशनल (गुणवत्ता कौशल्य) यांसह परदेशी भाषा आणि कार्पोरेट स्कील्स आदी पूरक कौशल्ये माहिती असल्यावरच त्यास करिअर प्लॅनिंग करणे सहज शक्य आहे. अशाच प्रकारे अन्य शाखांसाठी विशिष्ट प्रकारच्या कौशल्यांद्वारे स्वतंत्रपणे करिअर प्लॅनिंग करता येते.

आय.टी. या तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रात शिरकाव केल्यामुळे पारंपारिक कौशल्ये पूर्णतः: बदलून गेली आहेत. तसेच सातत्याने बदलत आहेत. अभ्यासक्रम आणि तदनुषंगिक रोजगाराची परिमाणेही वेगवेगळी होऊ लागली आहेत. त्यामुळेच पूरक कौशल्य निवडीचे मोठे आव्हान युवकांपुढे आहे.

अभ्यासक्रमाची निवड

दहावीनंतर विज्ञान शाखेतील बारावीचा पर्याय निवडताना ‘पी.सी.एम.’, ‘पी.सी.बी.’, किंवा ‘पी.सी.एम.बी.’ या विषयांचा ग्रुप जाणीवपूर्वक घेताना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता परिक्षांची माहिती घेणे अत्यावश्यक बनले आहे. मूलभूत विज्ञानशाखा, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि उपवैद्यकीय या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध होत असतानाच त्यापैकी पर्यायांची निवड ही स्वगुणवत्तेच्या आधारे करताना प्रवेशाच्या स्पर्धेचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.

भाषा शास्त्रासारख्या कला शाखेतील अभ्यासक्रमासही तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने अनेक नविन शाखांचा उदय झाला आहे. पत्रकारिता, भाषा विकास तज्ज्ञ, भाषा विज्ञान, विज्ञान भाषा संवाद, दृकश्राव्य भाषा विज्ञान, विकास संवाद, व्हिज्युअल लॅंग्वेंज फॉर डिजिटल मीडिया आदी सारख्या अनेक उपशाखांमधील अभ्यासक्रमांची उपलब्धता असल्याने अद्ययावत कौशल्यांचे महत्त्व करिअर संधींसाठी मोठ्या प्रमाणात वाढते आहे.

कुशल मनुष्यबळाची परिमाणे

दैनंदिन वापरामध्ये आणि औद्योगिक कार्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर आणि प्रक्रियांचे ‘ॲटोमायझेशन’ यामुळे जीवन पद्धतींमध्येही आमूलाग्र बदल होणार आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे तंत्रकौशल्ये, व्यावसायिक कौशल्ये आणि उद्योजकीय कौशल्ये सर्वाधिक प्रभावित होणार असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर अपरिहार्य आहे.

झपाट्याने औद्योगिक कौशल्यांचे बदलते स्वरूप आत्मसात करून भविष्यातील आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळाचा वेध घेणे महत्त्वाचे आहे. चौथ्या औद्योगिकीकरणात ‘डिजिटायझेशन ऑफ इंडस्ट्री प्रोसेसेस’मुळे कुशल मनुष्यबळाची परिमाणे बदलणार आहेत याचा परिणाम ‘करिअर प्लॅनिंग’ च्या प्रक्रियेवरही दिसणार असल्याने अभ्यासक्रमाची निवड आणि पूरक कौशल्यांची जोड याचा विचारही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशिष्ट प्रकारची व्यावसायिक पात्रता आणि त्यास पूरक कौशल्यांसाठी करिअर मॅपिंग महत्त्वाचे ठरते आहे. मूलभूत ज्ञानाबरोबरच संवाद क्षमता, रोजगार क्षमता आदी कौशल्येही महत्त्वाची आहेत.

डॉ. दीपक ताटपुजे

----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२२: करिअर प्लॅनिंग काळाची गरज
28th November 2023

Career In Railways