Career Guidance

Career Guidance

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३

PUBLISH DATE 3rd July 2023

राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने (Congress Government) शिक्षक भरतीप्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३,५०० शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

या निर्णयामुळे सरकारी शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरात सुरू असलेली शिक्षकभरती (Teacher Recruitment) प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, राज्यात पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शिक्षक भरतीसाठी गुणवत्ता परीक्षा घेतल्यानंतर राज्यभरात १३,५०० शिक्षक पात्र ठरले होते.

त्यानुसार शिक्षण खात्याने भरती प्रक्रियेसाठी लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांची सुधारित यादी जाहीर केली. त्यानंतर पुन्हा आक्षेप मागवून शिक्षण खात्याने काही दिवसांपूर्वी अंतिम यादी जाहीर केली. तसेच पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम देखील पूर्ण केले आहे.

राज्यात तीस हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३,५०० शिक्षकांच्या भरतीनंतरही दरवर्षी काही प्रमाणात शिक्षकांच्या जागा भरती करण्यासाठी टीईटी व सीईटी घेण्याचा निर्णय देखील शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे अनेक शाळांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्याने भरती केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या जागा सहावी ते आठवीसाठी भरती केल्या जाणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ६५ शिक्षकांचा देखील समावेश आहे.

पोलिस पडताळणीला सुरुवात

शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पोलिस पडताळणीला सुरुवात झाली आहे. पोलिस पडताळणी हा शिक्षक भरती प्रक्रियेचा एक भाग असल्याची माहिती शिक्षण खात्याने दिली आहे. शिक्षक भरती पारदर्शकपणे पार पडावी यासाठी शिक्षण खाते प्रयत्नशील आहे.

 

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
30th April 2024

While deciding the career

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
6th February 2024

Career In Fashion Designing

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
1st January 2024

AI Trends 2024

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
25th December 2023

Skill Development Courses 2024

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
25th December 2023

UPSC Free Coaching

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
23rd December 2023

Career Tips

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
14th December 2023

Career Tips

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
8th December 2023

Career Options for Arts Stream

राज्यात लवकरच 13,500 शिक्षकांच्या जागा भरणार २०२३
28th November 2023

Career In Railways