Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी

PUBLISH DATE 20th July 2023

मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हा उद्योग, व्यवसाय आणि रोजगार यांच्यासाठी नेहमीच महत्त्वाचा घटक राहिला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन क्षेत्र अधिक गतिमान, कार्यक्षम आणि नवनव्या संधी देणारे ठरले आहे.

आजही याच क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती क्षमता असल्याने नवीन तंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात केल्यास या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी संधीला मर्यादा नाहीत. त्यामुळे नव्याने व्यवसाय, रोजगार किंवा गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्पादन क्षेत्रात आपण कोठून सुरुवात करू शकतो याचा अवश्य विचार करावा.

‘बेलराईज इंडस्ट्रीज’ म्हणजेच (पूर्वाश्रमीची बडवे इंजिनिअरिंग)ने सात राज्यांमध्ये ३० हून अधिक कारखाने निर्माण केले आहेत. ‘बेलराईज इंडस्ट्रीज’ उद्योग समूहाद्वारे दोनचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनाच्या निर्मितीसाठी लागणारे सुटे भाग उत्पादित केले जातात. त्यांना बाजारात मोठी मागणी आहे.

मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘इव्ही’ म्हणजेच ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’हा एक मोठा नवीन ट्रेंड आहे. भारतातील इव्ही मार्केट २०२६पर्यंत ३६ टक्केच्या कंपाउंड अॅन्युअल ग्रोथ रेट (CAGR)ने वाढेल असा अंदाज आहे. कोरोनानंतर वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे उत्पादन क्षेत्रांमध्ये 4M म्हणजेच, कौशल्य, मानव संसाधन, मशिनरी, मेथडॉलॉजी, मनी म्हणजेच खेळते भांडवल यांची सांगड घालावी लागते. त्यासाठीही कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

उत्पादन क्षेत्रात इव्ही, इंडस्ट्री 4.0, ऑटोमेशन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणात उपयोग इंडस्ट्री 4.0 मध्ये होतो. त्यासाठी कुशल मनुष्यबळ गरजेचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘एआय’ आणि इंडस्ट्री 4.0 साठी लागणारी कौशल्य घेण्यावर भर द्यावा.

दीर्घकालीन आणि शाश्वत पुरवठा साखळी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करणे, नावीन्यता, तंत्रज्ञानाचा जलद गतीने वापर, ग्राहकांना सानुकूलित उपाय प्रदान करणे आणि त्वरित स्केल करण्याची क्षमता आज ऑटोमोटिव्ह उद्योगात अत्यावश्यक आहे. भारतीय ग्राहकांसाठी आणि परिस्थितींसाठी सानुकूलित करता येऊ शकणाऱ्या जगामध्ये उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करणे काळाची गरज आहे.

‘एआय’च्या वापरामुळे प्रोसेस आणि सिस्टीम जलद गतीने उत्पादन करण्यास मदत करतील. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या ‘स्मार्ट टेक्नॉलॉजी’ ही उद्योग जगताला कलाटणी देणारी नवीन संकल्पना उदयास येत आहे. तसेच ईएसजी (Environmental social & governance) या अंतर्गत ‘सस्टेनेबल प्रोसेसेस अँड कार्बन न्यूट्रल प्रॅक्टिसेस’ इंडस्ट्रीसाठी महत्त्वाचा घटक बनले आहेत.

‘डाटा ड्रिव्हन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ हा महत्त्वाचा ट्रेंड असल्याने ''सप्लाय चेन री-असेसमेंट'' हा महत्त्वाचा व अभ्यासपूर्ण विषय ठरत आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि आरोग्य या विषयाला ही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सामावून घेतले आहे. आभासी वास्तव (VR) आणि संवर्धित वास्तविकता (AR), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या प्रणाली, मॅन्युफॅक्चरर्स, रिमोट मॉनिटरिंग, सर्व्हिसिंग यासाठी मुख्यत्वे खूपच उपयोगी ठरत आहेत.

थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ही फक्त प्रोटो टायपिंग साठीच अतिशय उपयुक्त नसून, उत्पादनांचे सानुकूलन (customization ofproducts) तसेच या तंत्रज्ञानामुळे अतिशय जलद गतीने देखभाल आणि दुरुस्ती करणे सोपे झाले आहे.

रोबोटिक्स, ऑटोमेशन, बिझनेस इंटेलिजन्स या सारख्या नावीन्यपूर्ण संकल्पना मोठ्या प्रमाणात उद्योगात आणल्या जात आहेत. ‘एआर’ आणि ‘व्हीआर’ यामुळे आम्हास वेगवेगळ्या थ्रीडी डिझाईन्स, व्हिज्युअलायझेशन सारख्या गोष्टी सहज शक्य होत आहेत. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा बारकाईने अभ्यास करून उत्पादन क्षेत्राचा वेग वाढविण्यासाठी, दर्जा सुधारण्यासाठी उपयोग केल्यास या क्षेत्रात अनेक नव्या संधी उपलब्ध होतील.

लेखिका- सुप्रिया बडवे

(लेखिका, ‘बेलराईज इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी संचालक आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------

 

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नोकरी/बाजारपेठ/उत्पादन क्षेत्रात संधी
28th November 2023

Career In Railways