Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व

PUBLISH DATE 12th July 2023

 

Education अभ्यासाच्या सवयींचा किंवा स्टडी हॅबिट्सचा पुढचा भाग म्हणजे आपण अभ्यासाचं नियोजन कसं करतो. आपल्याला एवढा प्रचंड अभ्यासक्रम पुढच्या पूर्वपरीक्षेच्या आधी किंवा आपण पुढची परीक्षा देणार आहोत त्याच्या दिलेल्या तारखेच्या आधी पूर्ण करायचा असतो, त्यासाठी आपल्याला सवय लावून घ्यावी लागते अभ्यासाच्या नियोजनाची.

या नियोजनाचा मुख्य घटक असतो तो म्हणजे ध्येय ठरवणे. या ध्येयांच्या बाबातीत आज सगळीकडे आपण काही परवलीचे शब्द ऐकतो ते म्हणजे नजीकची ध्येये (शॉर्टटर्म) आणि दूरची ध्येये (लॉँगटर्म गोल्स).

नजीकच्या ध्येयांमध्ये आपलं पुढच्या काही दिवसांचं, आठवड्यांचं किंवा महिन्याचं ध्येय ठरवणं येतं. आजच्या दिवसात किंवा या आठवड्यात किती अभ्यास झाला पाहिजे, हे ठरवणं खूप महत्त्वाचं असतं.

थोड्या काळासाठी काही ध्येये निश्चित केल्यास आपला मेंदू आणि शरीर अधिक जोमानं काम करू लागतो आणि अभ्यासाची सवय झाल्यावर ही ध्येये साध्य करण्याचं समाधान आपल्याला पुन:पुन्हा अनुभवावसं वाटू लागतं.

वेळेचं बंधन पाळा

याबरोबरच हळूहळू त्या चालू महिन्यात किंवा दोन महिन्यात आपला कुठल्या विषयाचा आणि किती अभ्यास झाला पाहिजे हे निश्चित करता येणंही महत्त्वाचं आहे. तसंच आठवड्यात ठरवलेला अभ्यास समजा त्या आठवड्यात काही कारणाने पूर्ण झाला नाही, तर रविवारचा अर्धा दिवस असा शिल्लक राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी ठेवावा.

अशाच पद्धतीने पुढच्या सहा महिन्यांत किती अभ्यास होईल, वर्षभरात किती होईल, दोन वर्षांत किती होईल याचा अंदाज बांधून तुम्हाला त्याचंही नियोजन करता आलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते केलं पाहिजे आणि घालून घेतलेलं वेळेचं बंधन पाळलं पाहिजे.

विषयांचं वैविध्य ठेवा

अभ्यासाचं नियोजन करताना त्यात विषयांचं वैविध्य ठेवा. सोमवारी इतिहास, मंगळवारी भूगोल, बुधवारी विज्ञान, गुरुवारी अर्थशास्त्र असा बदल करत राहा. कोणत्या विषयाला आपल्याला किती वेळ द्यायचा हे ठरवा. सर्व विषयांना पुरेसा वेळ द्या. हे नियोजन करताना आपल्याला कोणता विषय वाचायला, समजून घ्यायला किती वेळ लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे.

येत्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या चालू घडामोडी, त्याच्याशी संबंधित आकडेवारी इत्यादी गोष्टींना महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मी सलग दोन वर्षं जेव्हा यूपीएससीवर लक्ष केंद्रित करून अभ्यास केला, तेव्हा त्या दोन वर्षांत माझा त्याचा सखोल अभ्यास झाला होता.

माझ्या अभ्यासाची पद्धत वेगळी होती. मी कोणताही विषय वाचायला घेतल्यावर माझा वाचनाचा वेग मला माहिती होता. माझ्या त्या-त्या विषयाच्या आवडी-निवडीनुसार वाचनाचा हा वेग बदलत असे.

मी साधारण तीन ते चार महिन्यांचं नियोजन करायचे आणि त्या चार महिन्यांत मला ८० पुस्तकं वाचायची असतील, तर त्या दृष्टीनं तयारी करायचे आणि मला हेही माहिती असायचं, की मी कोणता विषय लवकर विसरते. अर्थात, प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. त्या लक्षात घेऊन अभ्यासाचं नियोजन करावं.

लेखिका- सोनल सोनकवडे

 

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: अभ्यासाच्या नियोजनाचे महत्त्व
28th November 2023

Career In Railways