Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड

PUBLISH DATE 31st August 2023

अनेक मुलांना प्रश्न पडतो की मी नक्की कोणते करिअर निवडावे. म्हणजे वडील सांगतात, डॉक्टर हो, आई म्हणते शास्त्रज्ञ किंवा संशोधक हो. आणि मित्रांनी तर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आहे. अशा परिस्थितीत नेमके आईचे ऐकायचे, वडिलांचा सल्ला मानायचा की मित्रांच्या मार्गाने जायचे असा प्रश्न पडतो. सगळेच हितचिंतक असतात.

अशा परिस्थितीत ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ याचा अंगीकार करावा. मला नक्की काय आवडते. मला संशोधन करायला आवडेल की रुग्ण तपासायला. किंवा मला मशिन दुरुस्त करायला हे स्वतःलाच माहीत असते. स्वतःच्या आवडीचे आणि समजेल असे क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्राचा करिअर म्हणून विचार केल्यावर अपयश येणारच ना.

यासाठी स्वतःला काय आवडते आणि समजते ही दोन करिअर निवडीची महत्त्वाचे निकष असावेत. आई, वडील, काका, काकू, मित्रपरिवार मी निवडलेल्या करिअरच्या प्रवासात मदत करू शकतात, परंतु प्रवास स्वतःलाच करावा लागतो. तो दुसरे कोणी करू शकत नाही.

स्वतःची आवड कोणती आहे, कोणते अभिनेते-अभिनेत्री आवडते, तेच का आवडतात, कोणती पुस्तके आवडतात, एखादा लेखक खूप आवडतो किंवा एखादा अजिबात आवडत नाही, कोणता विषय खूप आवडतो हे लक्षात घेतले पाहिजे. स्वतःची ओळख ही करिअरच्या निवडीची आणि व्यक्तिमत्त्व विकासाची पहिली पायरी आहे.

व्यक्तिमत्त्व विकास करायचा असल्यास सर्वप्रथम मी नक्की कोण आहे, आपली बलस्थाने, कमकुवत दुवे कोणते आहेत याची माहिती होणे आवश्यक आहे. आयुष्यात काय करायचे हे निश्चित करण्यासाठी आपली बलस्थाने आणि कमकुवत मुद्दे याची माहिती पाहिजेच.

ते माहिती नसल्यास इतरांपेक्षा आपण कोणती गोष्ट चांगली करू शकतो हे समजणारच नाही. करिअर म्हणजे तरी नेमके काय असते? जे काही कराल ते उत्तम करण्याचा प्रयत्न करा. क्षेत्र कोणतेही असो स्पर्धा असो वा नसो आपण नेमून दिलेले काम अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पाडतोय.

काम हेच आपले बलस्थान असले पाहिजे. त्यासाठी SWOT अॅनालिसीस करणे आवश्यकच आहे. आपल्याला मनुष्याचा जन्म का मिळाला याचा शोध घेणे हे आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे काम आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला काही बलस्थाने, बुद्धिमत्ता, गुण असतात. या गुणांचा मात्र प्रत्येकाने शोध घेतला पाहिजे.

- सोनल सोनकवडे

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------

 

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: आवड आणि करिअरची निवड
28th November 2023

Career In Railways