Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!

PUBLISH DATE 24th August 2023

आजीवन शिक्षणाची कल्पना अलीकडे लोकप्रिय झाली आहे. दिवसेंदिवस स्व-प्रारंभित शिक्षणाला महत्त्व वाढले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि व्यावसायिक अपस्किल किंवा रीस्किल करू पाहत आहेत. ‘अपस्किलिंग’ ही व्यावसायिक संदर्भात नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची प्रक्रिया म्हणून समजली जाते.

ज्यामुळे शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना स्वत-च्या कौशल्यावर अधिकाधिक काम करणे सोपे जाते. परदेशी शिक्षणाचा विचार करता अशा पद्धतीने कौशल्य विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना विकसित होत चाललेल्या शैक्षणिक बाबींसह गती राखता येते.

शिक्षण क्षेत्रात कळत-नकळतपणे अशा पद्धतीच्या अपस्किलिंगचा मोठ्याप्रमाणात परिणाम होतो. त्याचा परिणामाविषयी जाणून घेऊयात. परदेशातील बऱ्याच उच्च शिक्षण संस्था त्यांच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक विकासासाठी आणि करिअरच्या प्रगतीसाठी कौशल्याने सुसज्ज करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची पदवी पूर्ण झाल्यावर ते त्यांना अभ्यासेतर करिअरच्या संधी उपलब्ध करतात.

जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी करिअरच्या दृष्टीने तयार करण्याच्या अंतिम दृष्टिकोनासह, शैक्षणिक संस्था विविध कौशल्यांवर आधारित उपक्रमांना प्रोत्साहन देत आखणी करतात. यामुळे, कोणत्याही विद्यापीठातून परदेशी शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर कंपनी व विद्यार्थी यातील अंतर कमी होते.

कंपन्या व नोकरीची संधी देणाऱ्या विविध संस्था विद्यापीठांशी संबंध निर्माण करतात, तेव्हा त्यांना योग्य कौशल्यांवर आधारित निवड करण्यास प्राधान्य देतात. या कारणास्तव, जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पोर्टफोलिओला त्यांच्या प्लेसमेंटपूर्वीच उच्च कौशल्य विकसित होण्याकडे भर देणे गरजेचे असते.

इतकेच नाहीतर वर्ल्ड एज्युकेशन फोरमच्या अभ्यासानुसार शिक्षण क्षेत्राने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढवण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबवले पाहिजे. हे‌ लक्षात घेता, परदेशातील बऱ्याच विद्यापीठांनी यावर काम करायला सुरुवात केली. यातून, विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपाचे ज्ञान वाढवणे आणि एखाद्या आवाका क्षेत्राचा आवाका लक्षात येणे सोपे जाते.

स्व-जागृती - परदेशी विद्यापीठातील अभ्यासक्रम हा विस्तृत स्वरूपाचा आहे. यातून, स्वत-ची गुणांच्या क्षमतेचा अंदाज घेण्यास मदत होते. तिथल्या अभ्यासक्रमात वैविध्यपूर्णता असल्याने स्वत-बद्दल किंवा जीवनाबद्दलच्या पूर्वकल्पना बदलतात. त्यामुळे तुमचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास होतो.

या व्यतिरिक्त टीमवर्क, नेतृत्व कौशल्ये, आंतरसांस्कृतिक कौशल्ये, कार्य नैतिकता इत्यादी इतर कौशल्ये परदेशात अभ्यासक्रमातून आत्मसात होतात. परदेशात अभ्यास करणे म्हणजे केवळ तुमचा रेझ्युमे अधिक चांगला बनवणे नव्हे तर कार्यक्षम कौशल्यांसह स्वत-ला चांगले बनवण्यासाठी महत्त्वाचे आहे. परदेशात शिकत असताना सर्व प्रकारच्या परिस्थितीला स्वत-हून सामोरे जावे लागते. त्यामुळे, ही कौशल्य आत्मसात केल्यास आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

जीवनकौशल्ये - दैनंदिन जीवनातील गरजा आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला सामाजिक, मानसिक क्षमतांची आवश्यकता असते. त्याचा विकास करण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षणाचा समावेश परदेशी अभ्यासकात दिसतात.

जीवनातील दैनंदिन समस्यांना तोंड देण्यासाठी कमी वयात मुले शिकत असताना कामाचा अनुभव घेतात. हा अनुभव विचारात घेऊन त्यांचा जीवनांशी संबंध जोडला जातो. जीवनकौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून जीवन आणि शिक्षणा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे उच्च शिक्षणाचा प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होते.

इतकेच नाहीतर विद्यापीठ जीवन कौशल्यांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देते. तज्ज्ञांची व्याख्यान कृतिसत्रे, समुपदेशकाची नेमणूक शिक्षक व विद्यार्थी यामध्ये सुसंवाद घडण्यासाठी उपक्रम राबविले जातात.

समस्या निराकरण - नवीन कौशल्यांचा विकास रोजगारक्षमता आणि श्रम उत्पादकता वाढविण्यासाठी मदत करते. परदेशी शिक्षणाच्या रचनेत अशाच पद्धतीने संरचना केली जाते. फिल्डवर आधारित प्रकल्प, असाइनमेंट्स यामुळे, दर्जेदार कौशल्ये उत्पादकता वाढ आणि थेट विदेशी आंतरसंबंध सक्षम करतात. विद्यार्थ्यांची वर्तमान आणि भविष्यातील रोजगारक्षमता आणि उत्पादकता वाढते. विद्यार्थी सहजपणे समस्यांना तोंड देऊन त्यावर उपाय शोधतात.

प्रभावी संप्रेषण - परदेशात शिकत असताना, तुम्ही स्वतंत्र जागतिक नेटवर्क तयार करता. त्यासाठी, विद्यापीठाकडून विविध पोर्टर विद्यार्थांसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे तुम्हाला भौगोलिक सीमांच्या पलीकडे संधी शोधण्यात मदत करते.

- ॲड. प्रवीण निकम

(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेनिंग स्कॉलर आहेत.)

 --------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: परदेशी शिक्षणातील ‘अपस्किलिंग’ची गरज!
28th November 2023

Career In Railways