11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावीचे ऑनलाइन वर्ग आजपासून सुरू: जाणून घ्या

PUBLISH DATE 2nd November 2020

रोनाकाळात शाळा बंद असल्या, तरी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. यामध्ये बालवर्ग ते दहावीपर्यंत आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू आहे.

मात्र, नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडल्याने मार्चपासून या विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणाशी कोणताही संबंध राहिला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची ओरड पालक वर्ग करत होता. तसेच अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे घातक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने प्रवेश नसला, तरी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शिक्षण २ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचे सविस्तर वेळापत्रक आज विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. अशा प्रकारे प्रवेश न घेता विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे सर्वस्तरावरून याचे स्वागत होत आहे. या घोषणेनंतर पालक आणि विद्यार्थी यांच्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे.

सुमारे सात महिने दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाशी संबंध आलेला नाही, त्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. अभ्यासक्रम चांगल्या दर्जाचा शिकविला जावा यासाठी राज्यातील ८० शिक्षकांची टीम तयार केली आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांला परिषदेच्या युट्युब वाहिनीवरून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहितीही पाटील यांनी दिली. ज्या विद्यार्थ्यांना हे लाइव्ह पाहता येणार नाही त्यांना या युट्युब चॅनेलवर नंतर पाहता येणार आहे, असेही ते म्हणाले.

या उपक्रमात किती विद्यार्थी सहभागी होणार आहेत हे समजावे या उद्देशाने नोंदणी करण्यास सांगितल्याचेही पाटील म्हणाले. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांनी व्यक्त केले. या वर्षीच्या या अभूतपूर्व परिस्थिती विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले नाहीत अशा वेळी त्यांना अशा प्रकारे शिक्षण देण्याचा सरकारचा निर्णय विद्यार्थी हिताचा आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण म्हणून अशा पद्धतीचा उपयोग होऊ शकतो असेही डॉ. काळपांडे म्हणाले.

अकरावी ऑनलाइन शिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

MHT-CET PCB & PCM Mock Test 2020

NEET & JEE Mains Mock Test

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

 


Related News