Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’

PUBLISH DATE 26th July 2023

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंडस्ट्री 4.0 यामुळे ‘मॅन्युफॅक्चरिंग’सह प्रत्येक क्षेत्रात ऑटोमेशन येत आहे. सहाजिकच त्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान बदलत आहे. या बदलात टिकून राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत.

तंत्रज्ञानात एवढ्या वेगाने बदल होत आहेत, हे बदल स्वीकारण्याची, त्यासाठी स्वतःला तयार ठेवणाऱ्या कुशल मनुष्यबळाची नेहमीच गरज लागणार आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी स्वतःला सतत घडविण्याची, शिकत राहण्याची तयारी ठेवावी लागेल.

पदविका आणि पदवीधारक अभियंत्यांची उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यासाठी शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून प्रॅक्टिकल शिक्षणाची आवश्यकता असते. त्याचा शॉप फ्लोअरवर एक्झिक्युशन करण्यासाठी उपयोग केला जातो. शिक्षण आणि अनुभवाचा फायदा उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी होतो. अशा गुणवत्ता असलेल्या उत्पादनालाच ग्राहक मान्यता देतो.

आमचे ग्राहक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा बाबतचे नियम अतिशय कठीण होत आहेत. त्यामुळे अतिशय जोखमीने काम करून गुणवत्ता टिकवावी लागते. त्यासाठी चांगले मनुष्यबळ आवश्यक असते. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी पदवी अभ्यासक्रमासोबतच प्रॅक्टिकलवरही पुरेसे लक्ष द्यायला हवे.

तसेच ‘आयटीआय’, ‘एनएपीएस’ सारख्या कोर्सेसचे सर्टिफिकेशन घेतलेल्या कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. हाच विचार करून ‘बेलराईज इंडस्ट्री’ने ‘STEP’ (Skill Training and Employability Program) ही संकल्पना सुरू केली आहे. त्या अंतर्गत आम्ही आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या, अकुशल सहयोगींना नोकरीच्या संधींसह एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण, मोफत भोजन सुविधेसह देत आहोत.

हे राष्ट्रीय आर्थिक वाढीच्या दिशेने आणखी एक पाऊल ठरत आहे. ‘एआय’ही संकल्पना सध्या नवीन आणि थोडी खर्चिकही आहे. ‘एआय’चा जास्त प्रसार होईल आणि त्याची उपयुक्तता अधिक जाणवेल, त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर स्मार्ट फॅक्टरीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर वाढेल. ‘कौशल्यपूर्ण मानव संसाधन’ ही काळाची गरज आहे. परंतु त्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.

मागणी व पुरवठा यांची सांगड घालण्यासाठी ‘एआय’सारखे पर्याय भविष्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. तसेच या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीही कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची गरज भासणार आहे. उत्पादन क्षेत्रात पदवीधर अभियंता, पदविका अभियंता, एच.आर-आयआर प्रोफेशनल, एमबीए, सीए, सीएस, आदी प्रोफेशनल हवे असतात.

अनेक वर्षांच्या अनुभवातून असे लक्षात आले आहे की, अभ्यासक्रम आणि इंडस्ट्रीच्या अपेक्षा यामध्ये खूप तफावत आहे. मुख्यत्वे शिस्त, परिणामकारक संभाषण कौशल्य, लेखन कौशल्य, स्मार्ट वर्किंग, पेशन्स, अॅप्लिकेशन ऑफ नॉलेज या गोष्टींचा अभाव जाणवत आहे. ही कौशल्ये नव्याने या व्यवसायात येणाऱ्यांकडे असणे आवश्यक आहेत. सॅप (SAP) चे ज्ञान हवे. ‘इआरपी’ संबंधित, रोबोटिक, रोबोटिक प्रोग्रॅमिंगसारखे कोर्स करणे गरजेचे आहे.

कर्मचाऱ्यांसाठी इंडक्शन व विविध प्रकारचे प्रशिक्षण या महत्त्वाच्या प्रक्रिया अमलात आणल्या जातात. त्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची व्याप्ती योग्यरीत्या समजते. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी तयारी करणे आवश्यक आहे.

- सुप्रिया बडवे

(लेखिका ‘बेलराईज इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी संचालक आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: नवीन कौशल्येच ठरतात संधींची ‘स्टेप’
28th November 2023

Career In Railways