Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ

PUBLISH DATE 9th August 2023

आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली मुलं! मुलं मोठी झाली तरी पालकांसाठी लहानच असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयात पालक सहभागी होतात. किंबहुना आपल्याला जमले नाही, ते पाल्याने करावे हा मागचा सुप्त भाव असतो. पाल्याची बाल्यावस्था भरपूर एन्जॉय केलेली असते. यात पालक इतके बुडून जातात की, पाल्याने पौगंडावस्थेत, कुमारवयात कधी प्रवेश केला हे लक्षातच येत नाही. लक्षात येते तेव्हा सुरू होते पालकांची तारेवरची कसरत.

एखाद्या जंगलात चुकून एखादे वडाचे रोपटे उगवत असताना जनावरांच्या पायांनी तुडवले जाईल किंवा वादळ वाऱ्याने झोडपले जाईल. त्याच रोपट्याला कोणी कुंपण घातले तर ते जोमाने वाढेल, त्याची मूळ फांद्या बळकट होतील. आपल्या मुलांच्या बाबतीतही हेच तर असते. लहानपणापासून त्यांच्याभोवती संस्कारांचे कुंपण घातल्यास ते तोडण्याचा विचारही मनात येणार नाही.

मात्र सध्याच्या काळात आई-बाबा दोघेही नोकरी निमित्ताने घराबाहेर, घरात ना आजी ना आजोबा. परंतु आपली मुले निसर्ग नियमानुसार मोठी होतच असतात. त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक जडणघडणीतही बदल होतात. त्यांचे अवघे जगच बदलून जात असते. सगळेच कसे मस्त वाटते, बिनधास्त राहायचे, मित्र-मैत्रिणींबरोबर पिकनिक, मुलींशी, मुलांशी गप्पा, थोडीशी छेडाछेडी, मस्करी.

तुमच्या लक्षात आलेच असेल की यात मी आई-बाबांचा कुठेही उल्लेख केला नाही. कारण त्यांनी स्वतःच निर्माण केलेल्या या त्यांच्या विश्वात कुठेही आई-बाबा, आजी-आजोबा नातेवाईक यांना महत्त्व नसतं असे मी म्हणणार नाही. परंतु त्यांची भावनिक गुंतवणूक फारशी नसते. आपली ही ती असू नये अशी त्यांची अपेक्षा असते.

आता हे बरोबर की चूक हा खरोखरच विचारत पाडणारा वादाचा मुद्दा ठरू शकतो. आपली मुले शरीराने, मनाने, आणि विचारांनीही वाढत आहेत हे पालक मान्यच करायला तयार नसतो. अजूनही त्याने/तिने मी सांगेन तेच आणि तसेच कपडे वापरावेत, ठराविकच मुव्हीज बघाव्यात, आमच्याबरोबर लग्नकार्याला यावे, नातेवाइकांना भेटावे अशी मानसिकता असते. नेमकं हेच त्यांच्या पचनी पडत नाही.

‘पूर्वी नव्हतास तू असा.’ ‘आता काय शिंग फुटली का तुला?’ ‘किती झाले तरी आपली माणसे आहेत ती’’ वगैरे वगैरे पालक सांगत असतात. किशोरवयीन वयात तो ज्यांना आपले समजतो ती माणसे वेगळीच आहेत ना. खरे म्हणजे, तुमच्या प्रश्नातच उत्तर दिलेय तुम्ही. शिंग नाही फुटली परंतु मिसरूड तर फुटलेय ना? मग द्या की त्याला थोडासा मोठेपणा.

घरातल्या समस्यांची चर्चा करताना त्याचंही मत विचारा, एखादी पेलता येणारी जबाबदारी टाका त्याच्यावर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, पाल्याशी मोकळे व्हा. इतके मोकळे की, वर्गातल्या एखाद्या मुलीशी मैत्री झाल्याने त्याने आपणहून तुम्हाला सांगावे. ते खेळकरपणे मान्य करावे.

त्यामुळे डोळे कान उघडे ठेवून आपल्या मुलांच्या मित्र-मैत्रिणींकडे लक्ष ठेवा. एखादा मित्र/मैत्रीण चुकीची असल्याचे तुम्हाला जाणवले तर त्यांनाही त्याची जाणीव करून द्या. शक्य आहे की तुमचे म्हणणे त्यांना लगेच नाही पटणार, परंतु अनुभवाने, थोडीशी ठेच लागल्यानंतर नक्कीच पटेल. पुढील भागात करिअर निवडताना मुलांनी कोणती काळजी घ्यावी आणि पालकांनी त्यासाठी कशी मानसिकता ठेवावी, याची चर्चा करूयात.

लेखिका- मंजिरी चौधरी

विद्यार्थी-पालक संबंधांच्या अभ्यासक आहेत.

---------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
30th April 2024

While deciding the career

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२३: पाल्याच्या करिअरसाठी पालकांची साथ
28th November 2023

Career In Railways