Career Guidance

Career Guidance

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व

PUBLISH DATE 31st August 2023

मुलांच्या यशामध्ये पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. पाल्य जन्माला आला की लगेचच त्याने मोठेपणी कोण व्हायचे ते पालक ठरवून टाकतात! आणि तो स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवितात. दिवसातील पाच, सहा तास अभ्यास, जेवणाच्या टेबलावर पाठांतर, अर्धा तास करमणूक असे सगळे वेळापत्रक तयार होते.

दहावी, बारावीला तर पालक आणि पाल्य यांना अभ्यास आणि परीक्षा याशिवाय विश्वच उरत नाही. तुम्ही म्हणाल, ‘हे सगळे आम्ही त्याच्या भल्यासाठी, चांगल्या करिअरसाठी करतो ना.’ अगदीच बरोबर आहे हे म्हणणे. परंतु एक लक्षात घ्या, ‘अति सर्वत्र वर्ज्यते!’ त्यामुळे पाल्याच्या करिअरमध्ये लक्ष जरूर घाला; मात्र बळजबरी टाळा.

शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ मात्र गोड असतात, हे पाल्याला पटवून देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याच्या करिअरचा विचार तुमच्या आवडीनुसार नाही तर त्याचा कल पाहून करा.

शालेय, महाविद्यालयीन वयात पाल्यावर मित्र-मैत्रिणींचा प्रभाव जास्त असतो. समवयस्क असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, विचार सारखे असतात. तथापि काही वेळा असे होते की, मित्र सांगतोय म्हणून त्याचे अनुकरण केले जाते. मित्राने शास्त्र शाखेत प्रवेश घेतला की आपला पाल्य ही तेच निवडते.

अशावेळी पालकांनी त्याचा मित्र होणे गरजेच असते. त्याला खरंच शास्त्र शाखेची आवड आहे; की केवळ मित्रप्रेम, हे युक्तीने त्याच्याकडून काढून घ्या. त्याला हे पटवून द्या की तुझी नेमकी आवड काय आहे आणि त्यातच तू करिअर केल्यास तुझे आयुष्य छान कसे घडू शकते.

मात्र हे सगळ पटवून देताना तुमच्या बोलण्यात कुठेही नकारात्मक सूर लावू नका. थोडक्यात काय तर तुम्ही त्याच्याशी मोकळे व्हा आणि त्यालाही मनमोकळे बोलू द्या. लहानपणी सायकल शिकताना, तो पाय मारण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही तुमचा एक हात सायकलच्या सीटमागे ठेवून त्याच्याबरोबर पळायच्या.

पळताना हळूच तुम्ही हात काढून घेता हे त्याच्या लक्षातही येत नाही आणि बाबांचा हात आहे हे डोक्यात ठेवून तो पायडल मारत राहतो. आणि सायकल चालवायला शिकलो. अगदी तसेच आहे हे. सुरुवातीला त्याला आधार द्या, मदत करा, त्याचे मित्र बना.

त्याची निर्णय क्षमता इतकी वाढवा की त्याने निवडलेल्या करिअरमधील त्रुटी, धोके, त्याच्या लक्षात येतील आणि तुमच्याशी बोलूनच तो स्वतःच्या करिअरची दिशा ठरवेल. त्यासाठी मुलांना वेळ द्या. शक्य असेल तितके त्यांच्या आसपास रहा. त्याच्या मित्र-मैत्रिणींच्या, अध्यापकांच्या संपर्कात रहा. त्यामुळे, तुम्ही करिअर निवडीसाठी मदत केल्यामुळे तो मनासारखे करिअर निवडू शकता याची जाणीव त्याच्या मनात राहील.

- मंजिरी चौधरी

(लेखिका विद्यार्थी-पालक संबंधांच्या अभ्यासक आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------

 

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
27th June 2024

JoSAA Counselling 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
15th June 2024

JoSAA Counselling 2024:

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
7th June 2024

Career Opportunity

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
30th April 2024

While deciding the career

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
6th February 2024

Career In Fashion Designing

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
1st January 2024

AI Trends 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
25th December 2023

Skill Development Courses 2024

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
25th December 2023

UPSC Free Coaching

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
23rd December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
14th December 2023

Career Tips

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
8th December 2023

Career Options for Arts Stream

विद्यार्थी पालक संवाद २०२३: निर्णय प्रक्रियेतील भूमिकेचे महत्त्व
28th November 2023

Career In Railways