Career Guidance

Career Guidance

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज

PUBLISH DATE 11th July 2023

Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप बदलणार आहे.

सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल होऊन, दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा मोलाचा वाट आहे.
जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून एआय लोकांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनायला लागला आहे.

आज, मशीन्सना तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात, एडिटिंग आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच कामे करतात. पण, एआयला माहिती पुरवणारे आणि हे तंत्रज्ञान विकसित करणारे तंत्र शिकण्याची संधी तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना मिळाली तर…? हो खरं आहे आणि हे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला परदेशवारी करायचीही गरज नाही. कारण, भारतातील पहिले एआय विद्यापीठ तुमच्यासाठी सज्ज झाले आहे.

आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असे बोलले जाते. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.


‘युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (AI Universal University) असे या विद्यापीठाचे नाव असून, १ ऑगस्टपासून या विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.

देशातील पहिले एआय विद्यापीठ :
महाराष्ट्रात मुंबईजवळ कर्जत येथे स्थापन करण्यात आले आहे. ग्रीन कॅम्पस असलेल्या या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिले विद्यापीठ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईजवळ सुरु झाले आहे.

जाणून घ्या अभ्यासक्रमांविषयी :

  • मुंबईजवळील कर्जत येथे १ ऑगस्टपासून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (Specialized Courses) सुरू करण्यात येत आहे.
  • या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिले जाणार आहे.
  • यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
  • या विद्यापीठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रूम्स, सुपर कम्प्युटर्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी वेगवेगळी तयारीही करण्यात आली आहे.
  • व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

ही आहे विद्यापीठाची वैशिट्ये :

-देशातील ही पहिले AI University महाराष्ट्रात मुंबईजवळील कर्जतमध्ये स्थित आहे.
- या विद्यापीठामध्ये एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
- जागतिक घडामोडी, कायदा, पर्यावरण, क्रीडा आणि विज्ञान सोबत व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटर यांसारख्या नव्या-जुन्या विषयांच्या संमिश्रित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
- जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी AI शिक्षण आणि संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
- AI विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत.
- प्रत्येक विषय शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा चा वापर केला जाणार आहे.
- तरुणांना ऑगमेंटेड रिॲलिटी, मिक्स्ड रिॲलिटी, आयओटी, ब्लॉकचेन शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी विशेष प्रयोगशाळा (लॅब) तयार करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

-------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News


वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
30th April 2024

While deciding the career

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
14th February 2024

UPSC Exam Preparation Tips

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
6th February 2024

Career In Fashion Designing

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
1st January 2024

AI Trends 2024

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
27th December 2023

MPPSC Result 2019 Out

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
25th December 2023

Skill Development Courses 2024

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
25th December 2023

UPSC Free Coaching

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
23rd December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
14th December 2023

Career Tips

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
8th December 2023

Career Options for Arts Stream

वाटा करिअरच्या २०२३: भारतातील पहिले एआय विद्यापीठ सज्ज
28th November 2023

Career In Railways