11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२२-२३: प्रवेशांसाठी कागदपत्रांची आता ऑनलाइन पडताळणी

PUBLISH DATE 23rd April 2022

अकरावी प्रवेशासाठी (FYJC Admission 2022) आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, अर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र अकरावी प्रवेशासाठीच्या पोर्टलवर अपलोड करावी लागणार असून प्रवेश अर्ज भरतेवेळी ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला (11th Admission) सुरुवात करण्यात आली असून, प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांविषयीची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. या पत्रकानुसार इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), व्हीजेएनटी (भटके विमुक्त), विशेष राखीव प्रवर्ग (एसबीसी) या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. याचप्रमाणे व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट सादर करणे गरजेचे आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना (ईडब्ल्यूएस) आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू करावी, अशी सूचना शिक्षण उपसंचालकांकडून करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आजी-माजी सैनिकाचे पाल्य, स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य आणि बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य यांनाही संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. या सर्व कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून, गरज पडल्यास कागदपत्रांची पडताळणी ऑफलाइन पद्धतीने शाळा स्तरावरून केली जाणार आहे.

विद्यार्थी, पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन
'प्रवेशासाठी अपलोड करायची वेगवेगळी कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करायची याबाबत शिक्षण विभागाकडून विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन केले जाणार आहे. येत्या ११ मे रोजी यू ट्यूब, फेसबुक या माध्यमातून या मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे,' अशी माहिती शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2021: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2021 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2021 | JoSSA 2021 | MHT-CET 2021 | MBA 2021 | Pharmacy 2021 | Polytechnic 2021

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News