11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी ऑनलाइन विशेष फेरी: जाणून घ्या शाखानिहाय प्रवेश आणि कट ऑफ

PUBLISH DATE 29th December 2020

अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. या यादीनंतर अर्ज केलेले सुमारे ८ हजार ८५६ विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत.

तर मुंबई विभागात किमान ८९ हजार ४४ जागा रिक्त राहतील, असे चित्र दिसत आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची विशेष फेरीची गुणवत्ता यादी सोमवारी संध्याकाळी ५ वाजता जाहीर झाली. या यादीत मुंबई विभागातील कॉलेजांमध्ये सर्व शाखांच्या मिळून एकूण १,४८,३८६ जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण ६८,१७८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. यापैकी ५९,३२२ विद्यार्थ्यांना विशेष फेरीत कॉलेज निर्धारित करण्यात आली आहेत.

म्हणजे अर्ज केलेल्या सुमारे ८ हजार ८५६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ३५ हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले आहे. तिसऱ्या फेरीनंतर एक लाख ३५ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या यादीत कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शाखानिहाय प्रवेश

  1. कला - ४,४८७
  2. वाणिज्य - ३५,४२३
  3. विज्ञान - १८,८१९
  4. एमसीव्हीसी - ५९३
  5. एकूण - ५९,३२

मुंबईतील काही नामांकित कॉलेजांचे कट ऑफ (५०० पैकी गुण)

  1. एचआर कॉलेज - वाणिज्य : ४५५
  2. केसी कॉलेज - कला : ३९६ वाणिज्य : ४५२ विज्ञान: ३६७
  3. जयहिंद कॉलेज - कला : ४२२ वाणिज्य : ४५२ विज्ञान: ३६८
  4. रुईया कॉलेज - विज्ञान: ४६८
  5. रुपारेल कॉलेज - कला : ४३१ वाणिज्य : ४५७ विज्ञान: ४५१
  6. साठ्ये कॉलेज - कला : ३९० वाणिज्य : ४४७ विज्ञान: ४३६
  7. डहाणूकर कॉलेज - वाणिज्य : ४५५
  8. भवन्स कॉलेज -कला : ३९९ वाणिज्य : ४३८ विज्ञान: ४३३
  9. मिठीबाई कॉलेज - कला : ४४१ वाणिज्य : ४५५ विज्ञान: ३८३
  10. एनएम कॉलेज - वाणिज्य : ४६८
  11. वझे-केळकर कॉलेज - विज्ञान : ४६७

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions: https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

Vidyarthi Mitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News