11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश प्रक्रिया २०२०-२१: दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

PUBLISH DATE 5th December 2020

 सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर रखडलेली इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणारी अकरावी प्रवेश प्रक्रीया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेतील दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी ५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मुंबईत दुसऱ्या फेरीसाठी दोन लाख ४२ हजार २१९ जागा

सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगितली दिल्यानंतर रखडलेली विविध अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने एसईबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुंबई महानगर प्रदेशात एसईबीसी कोट्याच्या ३५ हजार ९३० जागांचा खुल्या प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. या जागा मिळून अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीसाठी दोन लाख ४२ हजार २१९ जागा उपलब्ध आहेत.

मुंबईत दुसऱ्या फेरीसाठी शाखानिहाय उपलब्ध जागा

  1. कला - २८,३९०
  2. वाणिज्य- १,३२,८५७
  3. विज्ञान - ७६,१७५
  4. एचएसव्हीसी - ४७९७

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाविद्यालयांमध्ये १ लाख ७ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी पहिल्या फेरीत ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित झालेले आहेत. तर ७६ हजार ४८६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १ लाख १ हजार १९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६४ हजार २२६ विद्यार्थ्यांनी अर्ज भरून लॉक केले आहेत. तर ८३ हजार ६७३ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झालेली आहे. त्यातील ७६ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले आहेत.

प्रवेशाच्या शर्यतीत ७६ हजार ७५४ विद्यार्थी आहेत. यातील ३० हजार ५४४ विद्यार्थ्यांनी यापूर्वीच पहिल्या फेरीत प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यामुळे दुसर्‍या फेरीतील प्रवेशासाठी ४६ हजार २१० विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. प्रवेशाचे सेटमॅट्रीक्स तयार केले आहे; तसेच सॉफ्टवेअरचे ऑडीट देखील झाले आहे. ५ डिसेंबरला दूपारी १२ वाजेपर्यंत गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Get complete Admission Guidance without stepping out of your house.

Join Telegram channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: https://t.me/VidyarthiMitra_AdmissionGuidance

Join WhatsApp Group channel For Engineering & Pharmacy Admission Guidance: Click here to Join WhatsApp Group

Medical Admissions : https://t.me/VidyarthiMitra_MedicalAdmission

VidyarthiMitra App link https://bit.ly/2ZmcyYY

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitraहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News