11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी प्रवेश २०२०: विद्यार्थ्यांचे 'या' शाखेला प्रथम प्राधान्य

PUBLISH DATE 25th August 2020

अकरावी प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पहिली पसंती दिली असून तब्बल ३४ हजार ०७१ विद्यार्थ्यांनी या शाखेसाठी नोंदणी केली आहे. तर विद्यार्थ्यांनी दुसरी पसंती वाणिज्य शाखेला दिली आहे.

केंद्रीय अकरावी प्रवेश नियंत्रण समितीने तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. समितीच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यंदा दहावीच्या कल चाचणीत गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांचा कल हा कला आणि ललित कला शाखेकडे असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी विज्ञान आणि वाणिज्य शाखेला अनुक्रमे प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे.

तात्पुरती गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांची नोंदणी :

शाखा उपलब्ध जागा विद्यार्थ्यांची नोंदणी
कला १५,६८१ ६,७५२
वाणिज्य ४२,८१५ ३०,७३२
विज्ञान ४३,९८१ ३४,०७१
एचएसव्हीसी ४,४९५ १,२६५

"पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जातील भाग दोन भरण्यासाठी बुधवारपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर कोटा प्रवेश प्रक्रियेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी देखील बुधवारपर्यंतची मुदतवाढ दिली आहे," अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.

(Edited by : Ashish N. Kadam)

विनामूल्य आयोजन ऑनलाईन मॉक एमएचटी-सीईटी, जेईई, नीट २०२०

नोंदणी येथे http: //www.vidyarthimitra.org/abvpmockexam

WhatsApp https://wa.me/917720025900

 

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News