11th Admissions 2024-25

11th Admissions 2024-25

अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणी १ जुलैपासून सुरू होणार

PUBLISH DATE 30th June 2020

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची वेबसाइट १ जुलैपासून सुरू होणार आहे. या वेबसाइटवर ज्युनियर कॉलेज नोंदणी करू शकतात.

दक्षिण, पश्चिम आणि उत्तर मुंबईतील कॉलेज १ जुलैला तर ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर महापालिकेतील कॉलेज २ जुलैला वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. तसेच यंदाच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती देण्यासाठी विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षणही आयोजित करण्यात आले आहे.

शिक्षण उपसंचालकांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात असे लिहिले आहे की, '२०१९-२० मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेले होते. मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR Region) सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशांचे लॉगिन आयडी व पासवर्ड २०१९-२० मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या माहितीतील आपल्या रजिस्टर्ड मोबाइलवर १ जुलै २०२० पासून पाठवण्यात येतील. त्या लॉगिन, पासवर्डच्या सहाय्याने २०२०-२१ या वर्षाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीमध्ये काही बदल असल्यास तो अकरावी ऑनलाइनच्या अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन करावा. हे संकेतस्थळ १ जुलै २०२० पासून सुरू होणार आहे.'

अकरावी प्रवेशाच्या वेबसाइट जाण्यासाठी येथे क्लिक करा

कनिष्ठ महाविद्यालयांना पाठविण्यात आलेले पत्र

प्रशिक्षण ऑनलाइन

कोविड - १९ प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा शाळा महाविद्यालयांना विभागनिहाय ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंकही विभागाने दिली आहे. meet. google.com/ktb-cwsq-dmq या गुगल लिंकद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले.

विभागनिहाय प्रशिक्षण पुढीलप्रमाणे होणार आहे -

विभाग - तारीख - वेळ
दक्षिण मुंबई - १ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२
पश्चिम मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी १ ते २
उत्तर मुंबई - १ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४
ठाणे मनपा / मिरा-भाईंदर मनपा - २ जुलै २०२० - सकाळी ११ ते दुपारी १२
कल्याण-डोंबिवली मनपा - २ जुलै २०२० - दुपारी १ ते २
नवी मुंबई मनपा / पनवेल / उल्हासनगर मनपा / अंबरनाथ नपा / बदलापूर नप - २ जुलै २०२० - दुपारी ३ ते ४

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2020 |

For all latest Govt Jobs 2019Railway JobsBank Jobs and SSC Jobs log on to https://goo.gl/YPjt94 We bring you fastest and relevant notifications on Bank, Railways and Govt Jobs. Stay Connected

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2020 | JoSSA 2020 | MHT-CET 2020 | MBA 2020 | Pharmacy 2020 | Polytechnic 2020

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.


Related News